

सांगली : पुढारी वृत्तसेवा : बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमसह पंधरा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना मिरज तालुक्यातील समडोळी येथे आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी, समडोळीतील नागरी वस्तीत असलेल्या एका मंदिरानजीकच्या घरामध्ये २०१३ पासून डॉ. प्रणय अशोक कौलापूरे हे भाड्याने राहतात. सोमवारी सकाळी कुटुंबासह ते पर्यटनासाठी गेले होते. घर मालक काही कामानिमित्त आले असता त्यांना डॉ. कौलापुरे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब डॉ. कोल्हापूरे यांच्या नातेवाईकांना दूरध्वनीवरून कळवली.
त्यानंतर त्यांनी परिस्थितीची खातरजमा करुन सांगली ग्रामीण पोलीसांत अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली. घरातून २५ तोळे सोने, १ किलो चांदी, ७० हजारांची रोकड असा १५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आ. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व विशेष पथक तपास करीत आहेत.
हेही वाचलंत का ?