उत्तर कोरिया अणुचाचणी घेणार; दक्षिण कोरिया, अमेरिकेचे संयुक्त हवाई चाचणीने उत्तर

उत्तर कोरिया अणुचाचणी घेणार; दक्षिण कोरिया, अमेरिकेचे संयुक्त हवाई चाचणीने उत्तर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोल (दक्षिण कोरिया)

दक्षिण कोरिया आणि अमेरिका या दोन देशांनी कोरियन द्विपकल्पाच्या पश्चिमेला असणाऱ्या समुद्रवर हवाई कवायती घेतल्या आहेत. उत्तर कोरिया अणुचाचणी घेण्याची शक्यता असल्याने या हवाई कवायती घेण्यात आल्याचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने  क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती, त्याला उत्तर म्हणून या कवायती घेण्यात आल्या. दक्षिण कोरियाचे F35A, F15K, FK-16 अमेरिकेने F-16 या विमानांनी या कवायतीत भाग घेतला.

या समुद्राला येलो सी म्हटलं जाते. तर दक्षिण कोरियात या समुद्राला पश्चिमी समुद्र म्हटलं जाते. मंगळवारी सकाळी या कवायती घेण्यात आल्या. रविवारी उत्तर कोरियाने लघू पल्ल्यावर मारा करू शकणाऱ्या ८ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. "जर उत्तर कोरियाने आगळीक केली तर त्वरित उत्तर देण्याची क्षमता दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने दाखवून दिली आहे," अशी प्रतिक्रिया दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या वृत्तात 'सीएनएन'ने उत्तर कोरिया अणुचाचणी करण्याची शक्यता असल्याचेही म्हटलं आहे.

द इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने उत्तर कोरिया भूमिगत अणुचाचणी घेऊ शकेल, असा अहवाल दिला होता. तर गेल्या महिन्यात अमेरिकेच्या लष्करी आणि गुप्तचर संस्थांनी उपग्रहांचा हवाला देत उत्तर कोरिया अणुचाचणी करण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते. पुंगे-री या साईटवर हे काम सुरू आहे, असेही या संस्थेने म्हटलं आहे.

उत्तर कोरियाने याच ठिकाणी पूर्वीच्या अणुचाचण्या घेतल्या होत्या. त्यानंतर अमेरिका, उत्तर कोरिया, आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेल्या करारानुसार या साईटवरील काम बंद करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांनी २०१७ला या साईटवर बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्रांनी २०१७पासून उत्तर कोरियाच्या अण्विक कार्यक्रमावर निर्बंध लादले आहेत. दक्षिण कोरियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी दक्षिण कोरियाचे लष्करी सामर्थ्यात वाढ करण्याची भूमिका घेतली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news