गुंडेगावात नाश्ता सेंटरमध्ये दारू विक्री; पोलिसांच्या कारवाईत 13 हजारांच्या 144 बाटल्या जप्त

गुंडेगावात नाश्ता सेंटरमध्ये दारू विक्री; पोलिसांच्या कारवाईत 13 हजारांच्या 144 बाटल्या जप्त

वाळकी : पुढारी वृत्तसेवा

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे अवैध देशी- विदेशी दारू विक्री करणार्‍यावर नगर तालुका पोलिसांनी कारवाई करत 13 हजार 380 रुपये किमतीची देशी देशी- विदेशी दारू व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे या गावात नाश्ता सेंटरमध्येच बेकायदेशीर दारू विक्री सुरू होती.

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे अवैध देशी विदेशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक दिनकर घोरपडे, पोलिस कर्मचारी भानुदास सोनवणे, बांगर यांनी गुंडेगाव येथे जाऊन विशाल पिंपरकर याच्या साईराम नाश्ता सेंटर येथे छापा टाकला. पिंपरकर हा त्याच्या साईराम नाश्ता सेंटरमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्री करताना आढळून आला. या छाप्यात त्याच्याकडून देशी दारुच्या 96 बाटल्या, टुबर्ग बियर 12, इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की 36 बाटल्या, अशा एकूण 13 हजार 380 रुपये किमतीच्या 144 बाटल्या दारू जप्त केली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news