सांगली : दरीबडची येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

सांगली : दरीबडची येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्‍यातील  दरीबडची येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हा अपघाताचा बनाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दिलीप महादेव वाघे (वय २६ रा. दरीबडची ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सिद्धनाथ हद्दीलगतच्या वनविभागातून जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान दिलीपचा मृतदेह मोटरसायकलीवर आढळून आला. या घटनेने दरीबडचीत खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सकाळी दरीबडची सिद्धनाथ फॉरेस्ट हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर दिलीप वाघे या तरुणाचा मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यानी भेट दिली.

घटनेची कसून चौकशी सुरू केली जात आहे. जत पोलीस तपास करीत आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button