सांगली : प्रेयसी आणि चैनीसाठी रेल्वेत मोबाईल चोरी | पुढारी

सांगली : प्रेयसी आणि चैनीसाठी रेल्वेत मोबाईल चोरी

मिरज :  पुढारी वृत्तसेवा
प्रेयसी आणि स्वत:च्या फायद्यासाठी रेल्वेत मोबाईल व रोख रक्कम जोणार्‍या शुभम विश्‍वास कांबळे (वय 26, रा. विकानंदनगर, विटा) याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 31 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात नोेंद करण्यात आलेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुभम कांबळे हा गलाई कामगार असून तो सध्या चेन्नईत काम करीत आहे. त्याची प्रेयसी अमरावती येथे आहे. तिला भेटण्यासाठी तो अधूनमधून चेन्नईमधून अमरावती येथे येत असे. परंतु प्रवासादरम्यान तो हुबळी, मिरज, सातारा, भुसावळ आणि जळगाव इत्यादी रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी करीतअसल्याचे तपासात उघड झाले आहे.
कराड येथे दि. 30 डिसेंबर 2021 रोजी रेल्वेत मोबाईलची चोरी झाली होती. याबाबत मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तांत्रिक तपास पोलिस करीत होते. या तपासात कराड रेल्वे स्थानकातून सुलेमान खान याचा मोबाईल शुभम याने चोरी केला असल्याचे निष्पन्न झाले होते.

भुभम याने चोरलेल्या विविध मोबाईलमध्ये सुलेमान याचे सिमकार्ड वापरले असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस शुभम याच्या विटा येथील आई-वडिलांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तपासासाठी शुभम याला चेन्नईमधून बोलावून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. शुभम याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले. शुभम हा चेन्नई येथे गलाई व्यावसायिक म्हणून काम करतो. त्याची अमरावती येथे प्रेयसी आहे. तिला भेटण्यासाठी जात असताना तो विविध रेल्वे स्थानकात चोरी करीत असे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button