नाशिक : मनपा निवडणुकीसाठी 31 मे रोजी सोडत, ओबीसी आरक्षणाविनाच होणार सोडत | पुढारी

नाशिक : मनपा निवडणुकीसाठी 31 मे रोजी सोडत, ओबीसी आरक्षणाविनाच होणार सोडत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य निवडणूक आयोगाने या महापालिकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी प्रभागनिहाय जागा निश्चित करण्यासाठी 31 मे रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या राखीव जागांसाठी सोडत काढली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहे.

नाशिकसह मुदत संपुष्टात आलेल्या 13 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निर्देशांनंतर 14 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर सोमवारी (दि. 23) निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्या स्वाक्षरीने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाने जारी केला. त्यानुसार येत्या 31 मे रोजी अनुसूचित जाती(महिला), अनुसूचित जमाती(महिला) व सर्वसाधारण महिला जागा निश्चितीकरिता प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
आरक्षण सोडतीसाठी वर्तमानपत्र, संकेतस्थळ, सूचनाफलकांवर जाहीर नोटीस प्रसिद्धी – 27 मे 2022.* अनुसूचित जाती(महिला), अनुसूचित जमाती(महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे – 31 मे 2022.* सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे – 1 जून 2022.* प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी – 1 ते 6 जून 2022.* हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्धी – 13 जून 2022. अनुसूचित जाती, जमाती आरक्षणाकरिता संभाव्य प्रभाग – अनुसूचित जाती ( संभाव्य 19 प्रभाग) – प्रभाग क्र.7,11,12,14,15,20,22,23,24,25,27,26,34,35,39,41,42,43,44.अनुसूचित जमाती (संभाव्य 10 प्रभाग)-प्रभाग क्र. 1,2,3,4,7,11,27,28,34

हेही वाचा :

Back to top button