सांगली : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क
राज्य उत्पादन शुल्क

सांगली, पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर विभागाने येलूर (ता. वाळवा) नजीक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीचा ६ लाख ५ हजार ५२० रूपयांचा विदेशी मद्य तसेच, अंदाजे ५१ लाख ७, ७८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक प्रशांत रासकर करत आहेत.

अधिक माहिती अशी, गोव्याहून पूण्याकडे गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेवून येलूर मार्गे कंटेनर जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर विभागाला मिळाली. ही माहिती मिळताच येलूरमध्ये सापळा रचला. यामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य, सहा चाकी कंटेनर, एक ब्रिझ्झा गाडी व कंटेनर मधील इतर मुद्देमाल असा एकूण ५१,०७,७८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करत, आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत १८० मिलीच्या ३८४० बॉटल व मालवाहतूक करणारा कंटेनर एम. एच. १२ क्यू जी २२७९ व सोबत पायलेटींग कार ब्रीझा एम.एच ५०एल ९९७० व इतर माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त मा.वाय.एम. पवार यांचे आदेशान्वये अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर विभागाचे निरिक्षक प्रशांत रासकर, उपनिरीक्षक शंकर रनपिसे ,उपनिरीक्षक अविनाश घाटगे , साहयक उपनिरीक्षक उदय पुजारी जवान राकेश बनसोडे , संतोष वेदे व इतर यांच्या पथकाने या कारवाईत विशेष कामगिरी केली.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news