Sangali: एक्स्प्रेस गाड्यात बेडरोल सुविधा पुन्हा सुरू | पुढारी

Sangali: एक्स्प्रेस गाड्यात बेडरोल सुविधा पुन्हा सुरू

मिरज पुढारी वृत्तसेवा :  एक्स्प्रेस गाड्यात वातानुकूल बोगीत गेली दोन वर्षे बंद केलेली बेडरोल सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मूल्यवर्धित प्रवासी सुविधा म्हणून रेल्वेने पुणे विभागातील 16 एक्स्प्रेसमधे वातानुकूलित बोगीत प्रवाशांसाठी डिस्पोजेबल बेडरोल कीट (बेड शीट, कव्हर शीट, पिलो, पिल्व्हो कव्हर व ब्लँकेट) विक्री सुरू केली आहे. (Sangali)

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी डिस्पोजेबल बेडरोल कीट (बेड शीट, कव्हर शीट, पिलो कव्हर व ब्लँकेट) विक्रीसाठी कंत्राट दिले आहे. दि. 1 मार्चपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. कोरोनामुळे ही सुविधा बंद करण्यात आली होती.

सातारा: पाच वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’; कोयना बोटिंगचा प्रस्ताव अडकला लालफितीत

कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर -धनबाद एक्स्प्रेस, कोल्हापूर – अहमदाबाद सुपरफास्ट कोल्हापूर -निजामुद्दीन सुपरफास्ट, पुणे- जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, पुणे-हावडा एक्स्प्रेस, पुणे-दानापूर मेल एक्स्प्रेस, पुणे -भगत की कोटी एक्स्प्रेस, पुणे वेरावळ एक्स्प्रेस, पुणे -भूज एक्स्प्रेस, पुणे गोरखपूर एक्स्प्रेस, पुणे -अहमदाबाद अहिंसा एक्स्प्रेस, पुणे -काझीपेट एक्सप्रेस ज्ञानगंगा एक्स्प्रेस, पुणे- लखनौ एक्स्प्रेस, पुणे – दरभंगा एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

जोखीम कमी करणारा ‘एसटीपी’

मिरज व कोल्हापुरातून सुटणार्‍या महालक्ष्मी, महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, राणी चेन्नम्मा, तिरुपती, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को-निजामुद्दीन, कोल्हापूर- नागपूर यासह इतर साप्ताहिक व दैनिक एक्स्प्रेसना वातानुकूलित बोगींची सुविधा आहे. या गाड्यांमध्ये मात्र अद्याप बेडरोलची सुविधा सुरू करण्यात आली नाही.

हेही वाचा

Back to top button