रेठरे धरण, पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे आज (रविवार) सकाळी नर जातीचा बिबट्या (Leopard) मृतावस्थेत आढळून आला. गेल्या दोन वर्षातील तालुक्यातील बिबट्याचा हा पाचवा बळी आहे.
रेठरे धरण – ओझर्डे सीमेवर संपत मदने यांच्या शेतामध्ये आज सकाळी अंदाजे दोन वर्ष वयाचा बिबट्या (Leopard) शेतकऱ्यांना मृतावस्थेत आढळून आला. तत्पूर्वी आज पहाटेच चार वाजण्याच्या समारास या घटनास्थळापासून दोन किलो मीटर अंतरावर एका वस्तीवर बिबट्याने कुत्र्याला ठार मारल्याचे शिवाजी पाटील या शेतकऱ्याने पाहिले होते.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळाळी दाखल झाले आहे. शवविच्छेदनानंतरच या बिबट्याचा (Leopard) मृत्यू कशामुळे झाला. हे स्पष्ट होणार आहे. यापूर्वी तालुक्यात चार बिबट्यांचा वाहणाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर काही बछडेही मृतावस्थेत आढळून आली आहेत.
हेही वाचलंत का ?