लाल मिरची झाली आणखी ‘तिखट’ ; गृहिणींचे बजेट कोलमडले | पुढारी

लाल मिरची झाली आणखी ‘तिखट’ ; गृहिणींचे बजेट कोलमडले

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा बाजारात यंदा लाल मिरची महागली असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. मिरचीचे उत्पादन घटल्याने मिरचीचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.
यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरची पिकाचे नुकसान झाले असून, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधून आवक कमी झाली आहे. यामुळे मिरची बाजारपेठेवर परिणाम झाला असून लाल मिरचीचे दर भडकले आहेत. पुढील दोन महिने लाल मिरचीचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिरचीचे दर (प्रतिकिलो)
संकेश्वरी : 240 ते 250 रु.
काश्मिरी : 450 ते 550 रु.
रुद्रा ब्याडगी : 240 ते 250 रु.
सिजेंटा ब्याडगी : 250 ते 260 रु.
हैदराबाद ब्याडगी : 270 ते 280 रु.
तेजा/लवंगी : 220 ते 240 रु.
गुंटूर : 200 ते 240 रु.

हेही वाचलत का ?

Back to top button