सांगली
सांगली : येलूर येथे गव्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
इटकरे: पुढारी वृत्तसेवा
वाळवा तालुक्यातील येलूर येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दोॆघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या घोल शिवार परिसरात घडली.
शिवाजी परसू कुभार (वय ४५), प्रा. सूर्यकांत बाळासाहेब जाधव (वय ३२, दोघे रा. येलूर) अशी या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शिवाजी कुंभार व त्यांची पत्नी आज सकाळी शेतात खोडवी गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी उसाच्या फडातून येवून गव्याने शिवाजी यांना धडक मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
- नात्यांना तडा! इचलकरंजीतील घटनेनंतर समाजमन सुन्नयाच परीसरात शेतात गेलेले प्रा. जाधव यांच्यावरही गव्याने हल्ला केला आहे. तेही जखमी झाले असून त्यांच्यावर येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत. ही घटना सकाळी सात वाजता घडली. तंटामुक्ती अध्यक्ष राजन महाडिक यांनी वन विभागाशी संपर्क साधून या हल्ल्याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
- गोवा कार्निव्हल : लोकपरंपराच कार्निव्हलची संकल्पना : लोगो, गीताचे अनावरण
- सातारा : परळी खोऱ्यातील सांडवली येथे अस्वलाचा हल्ला, वृद्ध गंभीर जखमी
- ब्लडबाथ! रशियाच्या युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात हाहाकार, काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा चुराडा

