नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग, सात जणांविरोधात गुन्हा

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग, सात जणांविरोधात गुन्हा
Published on
Updated on

नाशिक : भावास चांगली नोकरी लावून देतो असे सांगत लग्नाचे आमिष दाखवून एका कुटुंबाने महिलेचा विनयभंग करीत दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात नंदुरबार जिल्ह्यातील सात जणांविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयितांनी जुलै ते डिसेंबर 2021 या कालावधीत तिच्या असहायतेचा फायदा घेत दमदाटी व विनयभंग केला. संशयित नितीन सखाराम पाटील (54, रा. आमलाड, जि. नंदुरबार) यांनी पीडितेच्या भावास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. तर इतर सहा संशयितांनी त्यात तीन महिलांचा समावेश असून, सर्वांनी संगनमत करून पीडितेस वेगवेगळी आमिषे दाखवून दमदाटी करीत पोलिस आयुक्तांकडील तक्रार अर्ज मागे घेण्यास दबाव टाकला. तर नितीन पाटील यांनी विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news