मिरज : बारमध्ये दोघांचा धिंगाणा; डोक्यात फोडली बाटली | पुढारी

मिरज : बारमध्ये दोघांचा धिंगाणा; डोक्यात फोडली बाटली

मिरज : पुढारी वृत्तसेवा

शहरातील ओम गार्डन बिअर बारमध्ये दारूचे बिल देण्याच्या कारणावरून बार व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली फोडून हॉटेलची
नासधूस करण्यात आली. याप्रकरणी धनंजय दाणेकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. बारमध्ये धिंगाणा घालणार्‍या
रोहित राजेंद्र हंडीफोड (वय 28, रा. कमान वेस, मिरज) आणि सूरज राजकुमार कांबळे (वय 22, रा.
मंगळवार पेठ, मिरज) या दोघांना पोलिसांनी अटक केली.

सांगली : काँग्रेस, भाजपचा बहिष्कार; राष्ट्रवादीने रेटली महासभा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

रोहित व सूरज गुरुवारी दुपारी दारू पिण्यासाठी ओम गार्डनमध्ये गेले होते. त्यांनी बिअर, दारू व जेवणाची ऑर्डर दिली. दोघांनी दारू पिल्यानंतर वेटरने बिल दिले. परंतु दोघांनी कमी पैसे दिले. हॉटेलचे मॅनेजर दाणेकर यांनी त्यांना पूर्ण रक्कम मागितली. या रागातून दाणेकर यांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करून बिअरची बाटली त्यांच्या डोक्यात फोडली. हॉटेलच्या छताच्या काचा व झाडाच्या कुंड्यांची तोडफोड केली. दोघांनी हॉटेलची नासधूस करीत धिंगाणा घातला. “तुम्हाला कोणालाही सोडणार नाही”, अशी धमकी दिली असे त्यांनी फिर्यादीत म्हटले.

हेही वाचलत का ?

Back to top button