शिराळा : शिराळ्यात पुन्हा गव्यांचे दर्शन ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

शिराळा : शिराळ्यात पुन्हा गव्यांचे दर्शन ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिराळा (जि. सांगली) ,पुढारी वृत्तसेवा :  येथील मोरणा धरणाजवळील गायकवाड मळा, महाजनक, कदमवाडी, उपवळे (ता. शिराळा) येथील परिसरात शुक्रवारी पहाटे 4 पासून सकाळी 7 च्या दरम्यान चार गव्यांचे दर्शन झाल्याने शेतकर्‍यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सांगली : जयंत पाटील साखर सम्राटांच्या टोळीचे नेते : राजू शेट्टी ; पोलिसांकडून मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न

सकाळी 7 च्या दरम्यान हे गवे मोरणा धरणामधील पाणी पिऊन धरणाच्या काठावर बसल्याचे येथील शेतकरी पोपट कदम, दीपक कदम, संदीप शेवडे, प्रवीण शेवडे, नथुराम कदम, गौरव कदम यांनी पाहिले. या गव्यांना शेतकर्‍यांनी नागरिकांच्या मदतीने शेतातून हुसकावले. तेथून हुसाकवल्यावर गवे उपवळे, तडवळे येथून पुढे डोंगरात जंगलात निघून गेले.

सातारा : इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सदर गवे गुरुवारी रात्री धरणाजवळील गायकवाड मळा, महाजनकी परिसरात होते. याठिकाणी शेतातील ऊस व इतर पिकांचे नुकसान त्यांनी केल्याचे दिसून आले आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी गवे फिरलेल्या ठिकाणची पाहणी केली.

हेही वाचलत का ?

Back to top button