सातारा : इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग | पुढारी

सातारा : इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सातारा : पुढारी वृत्तसेवा
इन्स्टाग्रामवर या सोशल मीडिया वर बनावट खाते सुरु करून त्याद्वारे सातारा शहराच्या एका उपनगरातील 13 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विपुल विजय भोंडवे (मूळ रा. निढळ, ता. खटाव, सध्या रा. खावली, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, विपुल भोंडवे हा मूळचा निढळचा असून त्याचे वडील विजय भोंडवे हे सातार्‍यातील एका शाळेत शिक्षक आहेत. ते खावली परिसरात राहतात. विपुलने इन्स्टाग्रामवर बनावट नावाने बनावट खाते सुरू करून आपण मुलगी असल्याचे भासवत पीडित मुलीशी अश्‍लील चॅटिंग केले. त्याने 20 नोव्हेंबर 2021 पासून पीडितेला अश्‍लील फोटो व व्हिडीओ पाठवून, तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयितावर विनयंभग, पोक्सो, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचलं का

Back to top button