रायगड : ‘त्या’ माथेफिरूला न्‍यायालयाने २४ तासांमध्‍ये सुनावली शिक्षा

ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण
ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण
Published on
Updated on

म्हसळा; पुढारी वृत्तसेवा: म्हसळा तालुक्यातील कोळे गावात एका माथेफिरूने मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली हाेती. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याला २४ तासांच्या आत शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मौजे कोळे (जि. रायगड) येथील एका मंदिरातील मूर्तींचेविटंबना केल्‍याचा प्रकार घडला हाेता. मंदिराच्या पुजाऱ्यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी भादवि कलम 295 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

तपासादरम्यान संशयित आराेपी निखिल सुनील खेरटकर (वय-29 वर्ष, रा.कोंझरी वरचीवाडी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्याच्याकडे चौकशी केली. याप्रकरणात त्याचा सहभाग असल्याने निष्पन्न झाले. पाेलिसांनी त्याला अटक केली. आरोपीस दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन महिने कैदेची शिक्षा सुनावली. तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी केला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news