Rupali Chakankar Controversy: रुपाली चाकणकरांच्या अडचणीत भर; सुषमा अंधारे यांचा रायगडमधील व्यावसायिक संबंधांचा गंभीर आरोप

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर नवे वादंग; रोह्यातील बांधकाम प्रकल्प आणि सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यातील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह
Rupali Chakankar
Rupali Chakankar Inquiry pudhari photo
Published on
Updated on

रायगड : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशोकखरात आणि चाकणकर यांचे रायगडमधील व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Rupali Chakankar
JNPA Delhi: जेएनपीए–दिल्ली फ्रेट कॉरिडॉरला वेग; पनवेलमध्ये ट्रायल इंजिनची यशस्वी चाचणी

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुनील तटकरे यांचे बालेकिल्ला असलेल्या रायगडमधील रोहा येथे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात भागीदार असल्याची माहिती अंधारे यांनी दिली.

Rupali Chakankar
Raigad Chaitra Vasantotsav: चैत्र आगमनाने रायगडात वसंतोत्सवाची रंगत; निसर्ग, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम

कर्मा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी रोह्यातील रोठ खुर्द येथे एक बहुमजली इमारत उभी केली होती. विशेष म्हणजे, या इमारतीचे बांधकाम अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा दावा करत भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news