JNPA Delhi: जेएनपीए–दिल्ली फ्रेट कॉरिडॉरला वेग; पनवेलमध्ये ट्रायल इंजिनची यशस्वी चाचणी

9000 एचपी इंजिनचा वापर; मालवाहतूक आणि औद्योगिक विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा
जेएनपीए–दिल्ली फ्रेट कॉरिडॉर ट्रायल इंजिनची यशस्वी चाचणी
जेएनपीए–दिल्ली फ्रेट कॉरिडॉर ट्रायल इंजिनची यशस्वी चाचणीPudhari
Published on
Updated on

पनवेल : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जेएनपीए-दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाने आता वेग घेतला असून सोमवारी (30 मार्च) या मार्गावर ट्रायल इंजिनची पहिली यशस्वी चाचणी पार पडली. या यशस्वी चाचणीमुळे प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पनवेल परिसरातून जाणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेला नवी जोडणी मिळून मालवाहतूक व प्रवासी सेवेला गती मिळणार आहे.

जेएनपीए–दिल्ली फ्रेट कॉरिडॉर ट्रायल इंजिनची यशस्वी चाचणी
Raigad Chaitra Vasantotsav: चैत्र आगमनाने रायगडात वसंतोत्सवाची रंगत; निसर्ग, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम

या कॉरिडॉरसाठी उच्च क्षमतेच्या 9000 एचपी इंजिनचा वापर करण्यात येत असून, त्यामुळे मालवाहतुकीचा वेग आणि वहनक्षमता लक्षणीय वाढणार आहे. विशेष म्हणजे, कळंबोली येथे 110.5 मीटर लांबीचा देशातील सर्वात मोठा रेल्वे फ्लायओव्हर गर्डर उभारण्यात आला असून प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दिल्ली ते जेएनपीए (जवाहरलाल नेहरू पोर्ट) दरम्यान उभारला जात आहे. हा मार्ग गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून जातो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जेएनपीए बंदरातून थेट उत्तर भारतापर्यंत मालवाहतूक जलदगतीने करता येणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे.

जेएनपीए–दिल्ली फ्रेट कॉरिडॉर ट्रायल इंजिनची यशस्वी चाचणी
Karjat Jal Jeevan Mission Fail: कर्जतमध्ये ‌‘हर घर नल‌ से जल‌’ स्वप्न अपूर्णच; तालुक्यातील निम्म्याहून अधिक योजना रखडलेल्या

या कॉरिडॉरमुळे दुहेरी कंटेनर वाहतूक शक्य होणार असून, कंटेनर वाहतुकीचा कालावधी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. रायगड जिल्ह्यातील जेएनपीए पट्ट्यातील कामेही सध्या वेगाने सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकल्पामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठा बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news