रायगड : तीस हजारांची लाच घेताना सहाय्यक जिल्हा निबंधक जाळ्यात

रायगड : तीस हजारांची लाच घेताना सहाय्यक जिल्हा निबंधक जाळ्यात
Published on
Updated on

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : रायगडचा सहाय्यक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हा अधिकाऱ्याला 30 हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शैलेंद्र अर्जुन साटम (वय 52, रा.सोहम हेरिटेज, पाचपाखडी, ठाणे), असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सोमवारी नवी मुंबई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

नवी मुंबई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला तक्रारदार यांच्याकडून 5 लाख 30 हजार रुपयांची शैलेंद्र साटम याने मागणी केल्याची तक्रार मिळाली होती. यापैकी 30 हजारांची लाच घेताना अलिबाग पोलीस ठाण्याच्या शेजारीच असलेल्या सहा.जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हा अधिकारी कार्यालयात सोमवारी रात्री आठ वाजता सापळा रचून साटम याला रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय असून ते एमआयडीसी मधील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे काम त्यांना प्राप्त अधिकार पत्रांन्वये करतात. तक्रारदार यांच्याकडे एज्युडीकेशन कामाकरिता आलेल्या तीन फाईल्स त्यांनी  मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे जमा केल्या होत्या. तसेच त्या फाईल्सची ऑनलाइन फी व आवश्यक कागदपत्रे जमा केली होती. तरीही तीन फाईलचे एज्युडीकेशन करण्याकरिता व प्रत्येक फाईल मागे फायनल ऑर्डर देण्याकरिता प्रत्येकी 15 हजार रुपये अशी एकूण 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी साटम याने केली होती.

तसेच नवीन सबमिट केलेली ॲग्रीमेंट फॉर जॉब वर्कच्या एका फाईलच्या प्रतीपूर्तीकरिता 5 लाख रुपये व पूर्वी जमा केलेल्या एज्युडीकेशनच्या तीन फाईलचे 30 हजार रुपये, असे एकूण 5 लाख 30 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने कारवाई करत साटम याला अटक केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news