Pudhari 12th anniversary Alibag: अलिबागमध्ये आज दै. पुढारीचा 12 वा वर्धापनदिन सोहळा

मान्यवरांच्या उपस्थितीत रायगडातील कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा पुरस्कार; नाट्यरसिकांसाठी ‘यदा कदाचित रिटर्न्स’ची पर्वणी
Daily Pudhari anniversary
‘पुढारी’चा बुधवार, दि. 1 जानेवारी रोजी 86 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. File Photo
Published on
Updated on

अलिबाग : रायगडच्या मातीशी एक तप नाळ जुळलेल्या दै.पुढारीच्या रायगड आवृत्तीचा 12 वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी (1 जानेवारी) अलिबाग येथे मोठ्याउत्साहात साजरा होत आहे.

Daily Pudhari anniversary
Bhavani Devi jatra festival Khadipatta: भवानी देवीचा जत्रोत्सव उत्साहात साजरा; खाडीपट्ट्यात भक्ती-आनंदाचे वातावरण

यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत रायगडातील विविधक्षेत्रात वैशिष्ठ्यपूर्ण कामगिरी केलेल्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारआहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी पुढारी परिवारातर्फे सुरु आहे.

Daily Pudhari anniversary
Matheran Municipal Council: समन्वयातून माथेरानचा विकास साधू – नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी

अलिबागचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या चेंढरे बायपासवरील पीएनपी नाट्यगृहात गुरुवारी दुपारी 3.30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार जयंत पाटील, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी आ.अनिकेत तटकरे, पीएनपी सांस्कृतिक मंडळाच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहाभोसले, रायगड जिल्हा पोलीसअधीक्षक आंचल दलाल यांच्यासह गेल इंडिया लि.चे कार्यकारी संचालक अनुप गुप्ता, आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे, जेएसडब्ल्यू स्टील लि.चे वरिष्ठ जनसंपर्क प्रबंधक कुमार थत्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Daily Pudhari anniversary
Raigad Child Death Case | अखेर ८ महिन्यांनंतर न्याय! घूम येथील मुलाच्या मृत्यू प्रकरणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

यावेळी दै.पुढारीतर्फे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नवदुर्गांचा मान्यवरांच्या उपस्थितीत नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रायगडातील वाचक, नागरिकांनी मोठ्या संख्येनेउपस्थित रहावे, असे आवाहन दै.पुढारीच्या रायगडआवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, रायगड आवृत्ती ब्युरो चीफ जयंत धुळप यांनी केलेले आहे. सध्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी पुढारी परिवारातर्फे सुरु आहे.

Daily Pudhari anniversary
Winter Conducive Environment : आंबा कलमांसह कडधान्यासाठी पोषक वातावरण

रसिक वाचकांसाठी‌‘यदा कदाचित रिटर्न्स‌’ नाट्यप्रयोग

‌‘दै.पुढारी‌’च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धमाल विनोदी नाटकाचा आस्वाद वाचकांना देऊन नववर्षाचा प्रारंभ आनंददायी करण्याच्या हेतूने ‌‘यदा कदाचित रिटर्न्स‌’या संतोष पवार लिखितआणि दिग्दर्शित नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news