

रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला व रत्नागिरी, सातारा व रायगड या तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेला पोलादपूर तालुका मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गवर वसलेला आहे. पोलादपूरची भूमी ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करणारी आहे सह्याद्रीच्या मुशीत आणि सावित्रीनदीच्या कुशीत तालुका वसलेला आहे, पोलादपूरच्या जडण घडण शूरविराचा,संघटनेचा मोठा हातभार लाभला आहे.
तालुक्याला आध्यात्मिक व साहित्यिक वारसा लाभला आहे. तालुक्यतील शुरवीरांच्या स्फूर्तीदायक त्यागाची शिकवण देणारे इतिहासाची स्मारके असणारे कंगोरी, चंद्रगड, कोंढावी या सारखे किल्ले शिवकालीन गडकोट आहेत, ज्यांनी अतुल पराक्रम केला त्या वीरांची स्मारके, वारकरी संप्रदाय पंथ आहे त्याच प्रमाणे प्रल्हाद जाधव सारखे साहित्यिक, आहेत यंगब्लड संस्था ही तालुक्यातील दऱ्याखोऱ्यातुन भटकंती करत तालुक्याचा इतिहास सर्वदूर पोहचविण्याचे काम करत आहेत.
म्हसळातालुक्याची शैक्षणिक प्रगती होत आहे. मुलेच काय मुलींही डॉक्टर, इंजिनियर, संगणक तंत्रज्ञ होत आहेत साऱ्याच क्षेत्रात चमकत आहेत सुरेखा बोरवणकर पोलीस दलात काम करत आहे. 1861 साली पोलादपूर तालुक्यतील पहिली शाळा निघाली तालुका नं 1 यानंतर रयत शिक्षण संस्थेने तालुक्यात 1954- 55 मध्ये पाहिले हायस्कुल सुरू केले. आज मितीस तालुक्यात 134 प्राथमिक शाळांसह 14 हायस्कुल 5 खासगी शाळा 1 उच्च माध्यमिक विद्यालय 2 महाविद्यालय 1 तांत्रिक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. मराठी शाळा प्रमाणे गेल्या काही वर्षांत तालुक्यतील इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आणि तालुक्यतील विद्यार्थ्यांना तालुक्यात दर्जेदार शिक्षण मिळू लागले.
पर्यटनच्या बाबतीत पोलादपूर तालुका वंचित राहिला आहे. कोकण ग्रामीण पर्यटनच्या माध्यमातून देवळे येथील शिवमंदिर, कुडपण, झुलता पूल, उमरठ, कवींद्र परमानंदसह कोंगोरीगड, ढवळे-चांदके खोऱ्यातील चंद्रगड,कोंढवीगड याचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. या किल्ले वास्तूचा विकास केल्यास पोलादपूर तालुक्यातील पर्यटन वाढीस लागून महसुलात भर पडणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने देशहितासाठी कित्येक योजना राबविल्या खेडोपाडी त्याचा प्रसार केला इथले लोक परिस्थितीशी झगडताना दुःख विसरण्यासाठी चुलीवर गुळाची दारू उकलीत असायची म्हणून रायगड जिल्ह्यात कित्येक गावात दारूबंदी संस्कार केंद्र उभारली गेली होती. तसेच पोलादपूर मध्ये संस्कार केंद्र उभारण्यात आले होते. कालांतराने दारूबंदी हा शब्द गेला आणि संस्कार केंद्र राहिले आहे.
या केंद्रातून गावातील लोकांना करमणुकीतुन संस्कार शिक्षण मिळत असे दरमहिन्याला 1 तरी जनजागृतीचा कार्यक्रम असत त्यात छोटे बोलपट असत पूर्वीच्या काळी महाड तालुक्यतील कै. बाबुराव रानडे हे कै. डॉ. करमरकर यांच्याकडे मुक्कामाला येत आणि विविध कार्यक्रम ते आखत असत तालुक्यातील सर्वजण कार्यक्रमाला लोटत असत,शेतीवर आधारित कार्यक्रम, शिक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी वाचन प्रभावी ठरते म्हणून करमरकर डॉक्टर यांनी केंद्रात पेटा वाचनालय सुरू केले, त्यावेळी ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी डी के जोशी हे वाचनालय चालवीत असत डॉ. गांधी उपसरपंच असताना त्यांनी लोकांना मुलांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध स्पर्धा सुरू केल्या महिलांसाठी विविध कार्यक्रम, सर्वच कार्यक्रम या केंद्रात होत असत, हे केंद्र गावाची शान होते. ग्रामपंचायतीचे ऑफिस इथेच होते वाचनालय सुद्धा होते, जेव्हा हायस्कुल सुरू झाले तेव्हा आठवी नववीचे वर्ग इथेच भरत असत संस्कार केंद्र हेच गावचे सर्वेसर्वा होते आता जुने संस्कार केंद्र गेले जुनी इमारत गेली नवीन इमारत उभी आहे. मात्र पूर्वीची शान वैभव त्या जुन्या संस्कार केंद्राभोवती एकटवले होते.
1949 साली तालुक्यात पेटा वाचनालयाची सुरवात करण्यात आली हळूहळू विविध पुस्तके गोल होऊ लागली. सद्यस्थितीत वाचकांची संख्या दोनशेपेक्षा जास्त तर पुस्तक ची संख्या 2 हजार पेक्षा जास्त आहे. 2005 च्या 26 जुलैच्या महापुरात होत्याचे नव्हते झाले होते. पुन्हा वाचनालय फिनिक्स पक्षासारखी भरारी घेत उभे राहिले आहेत.
1971-72 च्या शिमगोत्सव निमित्ताने विश्वास उर्फ मामा साबळे यांनी युवकांना संघटना का काढत नाही असा प्रश्न विचारून संघटनेच्या विचारणा चालना दिली. या सूचनेचा विचारांती झंकार स्पोर्ट्स क्लबची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, जिल्हा पातळीवर पोलादपूरचे नाव क्रीडानैपुण्यावर तळपत ठेवले क्रीडामध्ये नाहीतर सांस्कृतिकमध्ये नाव रोशन केले.काका किशाचा हे नाटक विद्यामंदिर पोलादपूरच्या मदतीसाठी केले होते क्लबमधील नाट्यकर्मी वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले, काका किशाचा ही चौकट वाटोळी अशी अनेक नाटके गणपती उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करण्यात येत असत. त्याचप्रमाणे दि लेप्रेसि मिशन हॉस्पिटलमध्ये ख्रिसमसच्या वेळी कार्यक्रम नाटके सादर करण्यात येत असत. 1971 ते 1980 पर्यतचे दक्षक या क्लबच्या माध्यमातून गाजवले जवळपास 30 वर्षे या क्लबने पोलादपूरचे नाव रोशन केले.पोलादपूर तालुक्यतील अनेक गावे डोंगर भागावर असल्याने विकासा पासून वंचित राहिला आहे. आज इंग्रजीशाळांचा शिरकाव झाला आहे. मात्र तालुक्यतील धरणाची कामे मार्गी न लागल्याने,मिनी औद्योगिक वसाहतची निर्मिती न केल्याने, बचत गटांना पाठबळ मिळत नसल्याने पोलादपूर तालुका विकासापासून वंचित राहिला आहे. तालुकात क्रीडांगण नाही मोठी शिक्षण संस्था नसली तरी पोलादपूरमधील विद्यार्थी महाड शहरातील किंवा मुंबई- पुणे या ठिकाणच्या मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेत तालुक्याचे नाव उंचावले. आजही गावागावातील तरुण तरुणी हाताला काम मिळावे म्हणून मोठ्या शहराकडे धाव घेत आहे.
पोलादपूर तालुक्यातील डोंगरात वसलेल्या दाभिळ गावची सुकन्या दीपाली पवार पोलीस भरतीसाठी प्रयत्न करताना त्यासाठी लागणाऱ्या फिटनेससाठी किक बॉक्सिंग या खेळाकडे वळली . पण तेच तिच्या आयुष्याचे ध्येय बनत गेले , तिने या क्षेत्रामध्ये प्रगती सुरू करून किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर मान मिळवला .परिस्थितीशी झगडत दीपाली खेळामध्ये यशाच्या पायऱ्या गाठत पुढे निघाले. दिपालीने संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे. आंतराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेऊन तुर्कस्तान येथे गोल्ड मेडल मिळवत शानदार कामगिरी केली .महाराष्ट्र किक बॉक्सिंग स्पर्धेत दिपलीने प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्रातील सर्वोत्तम किक बॉक्सर ठरली.