

रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड तालुक्यांतील डोंगरकुशीत लपलेले, निसर्ग सौंदर्याने नटलेले आणि पौराणिक घटनांची साक्ष देणारे अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. हे गणेश मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचे मानले जाते.
शरद निकुंभ, पाली
ऐतिहासिक पार्श्वभूमी
श्री बल्लाळेश्वराचे मूळ मंदिर लाकडी संरचनेत होते. इ.स. 1770 मध्ये बाबुराव फडणीस यांनी मूळ देवालयाचा जिर्णोध्दार करून पाषाणी देवालय बांधण्यास सुरुवात केली. त्यांचे पुत्र मोरोबादादा फडणीस यांनी प्राचीन वास्तुशास्त्रज्ञ कात्यायन यांच्या शास्त्रानुसार हे बांधकाम पूर्ण केले. मंदिराच्या रचनेत दोन गाभारे आहेत. बाह्य गाभारा षटबर्हिकोनी आणि आंतरगाभारा अष्टबाह्यकोनी असे अष्टदिशांचे सुयोग्य नियोजन केलेले आहे. ही वास्तुशास्त्रानुसार बांधलेली रचना भक्तांना सूर्यकिरणे आणि निसर्गाशी संलग्न अनुभव देते.
विशेषतः मंदिर पूर्वाभिमुख बांधले असल्यामुळे, दक्षिणायनातील उत्तरार्धात आणि उत्तरायणाच्या प्रारंभी सूर्याची किरणे बरोबर श्री बल्लाळेश्वराच्या मुर्तीवर पडतात, हे देखील एक वास्तुशास्त्रानुसार केलेले अद्वितीय नियोजन आहे. सभामंडपाचे बांधकाम इ.स. 1905 मध्ये अष्टस्तंभ आणि कमानींनी सुशोभित केलेले असून, प्राचीन देवालयाच्या दगडी चिरेबंदीचे रूप जपलेले आहे. या रचनेत वास्तुशास्त्र आणि नक्षीकाम यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो.
गाभाऱ्यात विराजमान श्री बल्लाळेश्वरांची अर्धगोलाकार स्वयंभू भव्य मुर्ती भक्तांना मंत्रमुग्ध करते. मुर्तीच्या डोळयात आणि नाभीमध्ये चमकणारे हिरे आहेत, पाठीमागे संपूर्ण चांदीमध्ये कोरलेली प्रभावळ आहे. मुकूट, बाजूचे मासे आणि शेज हे संपूर्ण सोन्याचे असून, कळसावरही सोन्याचा पत्रा आहे. ही सर्व सजावट भक्तांच्या देणगीतून देवस्थानाने केली आहे. मंदिरातील दगडी गाभारा, चिरेबंदी, अष्टबाह्यकोनी रचना आणि नक्षीकाम हे वास्तुशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. भक्तांना येथे फक्त दर्शनाचा अनुभव नाही, तर प्राचीन स्थापत्यशास्त्राची अद्भुतता अनूभवण्यास मिळते. आणि या अलौकीक स्थापत्यशास्त्रीय बांधकाम शैलीचा अभ्यास करण्याकरिता देश-परदेशातून अभ्यासक येथे येत असतात.
श्री बल्लाळेश्वर मंदिर सह्याद्रीच्या डोंगरकुशीत वसलेले असल्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना निसर्गसौंदर्याचा आगळा अनुभव सुद्धा मिळतो. पावसाळ्यात परिसरात हिरवाईची छाया, उंच डोंगर, प्रवाही पाण्याचे स्रोत आणि नैसर्गिक शांतता भक्तांचे मन प्रसन्न करते. मंदिराच्या सभामंडपातून डोंगरांच्या पृष्ठभागावरून सूर्यास्त आणि सूर्योदयाचा देखावा अतिशय मनोहारी दिसतो. हे मंदिर केवळ भक्तीच नाही, तर निसर्गभक्तांसाठी देखील एक आदर्श निसर्गस्थळ आहे.
माघ मासोत्सव हा वर्षभरातील श्री बल्लाळेश्वराचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचे उत्सव असतो. माघ महिन्यातील चतुर्थीला श्री गजानन मध्यरात्री प्रत्यक्ष भोजनासाठी येतात, अशी श्रद्धा असून, त्या दिवशी भक्तांची राज्य-परराज्ातून मोठी गर्दी होते.
या उत्सवात भक्तांसाठी भव्य मिरवणूक, भजनगजर, महानैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन असते. लहान-मोठ्यांसाठी उंच आकाश पाळणे, मिठाई, खेळणी, सौंदर्य प्रसाधने अशा विविध प्रकारच्या दुकानांची मांडणी केली जाते. यामुळे संपूर्ण तालुक्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
माघ मासोत्सवात लाखो भक्त उपस्थित राहतात. येथे भाविक फक्त धार्मिक अनुभव घेत नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद सुद्धा घेतात. प्रवचन, कीर्तन, भजन, मिरवणूक आणि महाप्रसाद यामुळे संपूर्ण उत्सवाचा अनुभव घेण्याकरिता गणेशभक्त येथे मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतात.
पालीतील श्री बल्लाळेश्वर हे देवस्थान अष्टविनायकांपैकी एक अत्यंत जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी ख्याती आहे. येथे नवस पूर्ण करणाऱ्या भक्तांचा विशेष सन्मान केला जातो. मंदिर प्राचीन वास्तुकला, निसर्गसौंदर्य आणि भक्तीच्या अद्वितीय संगमाचे प्रतीक आहे.
श्री बल्लाळेश्वर देवस्थान फक्त धार्मिक स्थळ नाही; हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे येणाऱ्या भक्तांना दर्शन, उत्सव आणि निसर्गाचा अनुभव एकत्र मिळतो.
संमोहन तज्ज्ञ महेष काटे हे सन 2007 पासून संमोहन थेरपीकरिता सुधागड तालुक्यात कार्यरत आहेत. गेल्या 18 वर्षांच्या श्री बल्लाळेश्वराच्या सानिध्यात त्यांना अनेक अनुभूती आल्या. या काळात येथे दुरवरुन येणाऱ्या गणेशभक्तांना निवासाकरिता आणि सात्विक भोजनाची अडचण भासत असल्याचे त्यांना प्रकर्षाने जाणवले. अनेक वेळा गणेशभक्तांना मूलभूत सुविधांअभावी त्रास सहन करावा लागत होता. याच अनुभवातून त्यांच्या मनात एक ठाम विचार रुजला आणि स्वतः पुढाकार घेऊन या उणिवा भरून काढल्या पाहिजेत.
याच उद्देशातून एडिसिया हॉटेलची संकल्पना आकाराला आली. श्री बल्लाळेश्वराच्या कृपेने हा संकल्प प्रत्यक्षात साकारला असल्याचा अनूभव संमोहन तज्ञ महेश काटे यांनी सांगीतला. एडिसिया हॉटेलमध्ये आम्ही कोणतेही हानिकारक कृत्रिम रंग किंवा अपायकारक पदार्थ न वापरता शुद्ध, सात्विक शाकाहारी जेवण भावीकांना माफक दरात उपलब्ध करुन देतो. तसेच भक्तांसाठी आणि प्रवाशांसाठी स्वच्छ, शांत व आरामदायी निवासव्यवस्था देखील भक्तीस्थळाचे पावीत्र्य ठेवून माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे काटे यांनी सांगीतले.
एडिसिया हॉटेल हे केवळ एक निवासस्थान किंवा हॉटेल नाही, तर श्री बल्लाळेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी एक विश्वासाचे ठिकाण आहे. प्रत्येक पाहुण्याला धार्मीकस्थळी घरासारखा अनुभव मिळावा, त्यांचा प्रवास सुखद व्हावा, येथील स्थानीक मार्गदर्शन त्यास उपलब्ध व्हावे आणि एकूणच त्यास मनःशांती लाभावी, अशी सामाजिक बांधीलकीची भावना आमची असते असेही त्यांनी अखेरीस सांगीतले.