Jayant Patil Alibag speech: ‘शिव्या देणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार?’ — जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला

अलिबागमधील सभेत मानसी दळवींवर टीका; थळ मतदारसंघातून सानिका घरत यांची उमेदवारी जाहीर
Jayant Patil Alibag speech
Jayant Patil Alibag speechPudhari
Published on
Updated on

अलिबाग : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि अलिबागचे आमदार जयंत पाटील यांनी अलिबागमध्ये आयोजित सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले, ‌‘ज्या महिला जाहीरपणे शिव्या देतात, त्यांना जिजाऊ पुरस्कार देणे हे राजमाता जिजाऊंचे घोर अपमान आहे.‌‘ अशी टीका त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यावर केली आहे.

Jayant Patil Alibag speech
Mhasla ZP Election: म्हसळ्यात जि.प. व पं.स. निवडणुकीची रणधुमाळी; युवकांना संधी की पुन्हा प्रस्थापितांनाच प्राधान्य?

यावेळी शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील म्हणाले, ‌‘राजमाता जिजाऊंनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, त्या कधीही कोणाला शिव्या देत नव्हत्या. आज कुणालाही जिजाऊ पुरस्कार मिळतोय; अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळाल्याने जिजाऊंनाही वाईट वाटले असते.“ त्यांनी सध्याच्या राजकारणाचा स्तर पाहून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.

Jayant Patil Alibag speech
JNPA Green Initiatives: जेएनपीएच्या हरित उपक्रमांमुळे वायुगुणवत्तेत मोठी सुधारणा

याच सभेत पाटील यांनी थळ जिल्हा परिषद मतदार संघातून सानिका सुरेश घरत यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. जयंत पाटील यांनी अलिबागच्या राजकीय इतिहासाची आठवण करून दिली. माजी आमदार नाना कुंटे यांच्या कर्तृत्वाचा आणि चारित्र्याचा उल्लेख करत त्यांनी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींचा दर्जा आणि सध्याची परिस्थिती यातील फरक स्पष्ट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news