

रायगड : जिल्हा परिषदेसाठी रायगडमध्ये नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप राष्ट्रवादी युती होणार असल्याचे सांगितले असताना भाजप नेते खासदार धैर्यशील पाटील यांनी शिवसेनेला बरोबर घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत जुन्या फॉर्म्यूल्याला छेद दिला आहे. त्यामुळे शेकाप राष्ट्रवादी एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रायगड जिल्हा परिषदेसह 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. या समीकरणांमध्ये शिंदे शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेकापला बरोबर घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र शेकाप नेते जयंत पाटील यांनी आम्ही महाविकास आघाडीबरोबर असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप बरोबर आघाडी करण्याची शक्यता आहे. कारण, दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादी तर उत्तर रायगडमध्ये शेकाप असे समीकरण उदयाला येऊ शकते. आणि या आघाडीत ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी सहभागी होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
एका बाजूला शिंदे शिवसेनेला रोखण्यासाठी नवी व्यूहरचना आखली जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. यासाठी इतर सर्व राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधून रायगड जिल्ह्यात नवी आघाडी आकार घेता येऊ शकते का, याचा अंदाज घेतला जात आहे. याबाबतची राजकीयखलबते सुरू आहेत. एकास एक पद्धतीने उमेदवार देत मतांची विभागणी टाळण्यासाठी हा नवा फॉर्म्यूला तयार होऊ शकतो, असे संकेत मिळत असताना वरिष्ठ नेत्यांनी मात्र हा फॉर्म्यूला नाकारला आहे.
रायगडात नुकत्याचझालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी(अजित पवार) यांच्यातच तुल्यबळ लढत झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेतील संघर्ष उफाळून आला आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जि.प.निवडणुकीत युती न करण्याचा निर्धारही केलेला आहे. यामुळे होतअसलेल्या जि.प. निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्परांच्या विरोधातउभे ठाकणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. सध्या रायगडात विशेष करून महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, तळा, मुरुड या तालुक्यात शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आहे. तर अलिबाग, मुरुडला
महायुती म्हणूनच आम्ही जि.प.निवडणुकीला सामोरे जात आहोत.आमचेघटक पक्ष शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अप) यांना एकत्रआणण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहेत.त्यातून जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन प्रसंगानुरुप योग्य निर्णयघेऊन आम्ही निवडणुका लढवू.
खा. धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप, दक्षिण रायगड
शेकाप विरुद्ध शिंदे शिवसेना, कर्जत, खालापूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत अपेक्षित आहे. पनवेलमध्ये शिंदे शिवसेना भाजपसमवेत आहे.मात्र तेथे त्यांचे अपेक्षित प्राबल्य नाही. उलट ठाकरे शिवसेनेने महापालिका निवडणुकीत लक्ष्यवेधी कामगिरी करुन दाखविली आहे. पेणमध्येभाजप, राष्ट्रवादीने एकत्रितपणे नगरपालिका निवडणुका लढविली आहे. तेथे शिवसेना विरोधातउभी होती. महापालिका निवडणुकीतीलअपयशानंतर राज्यातील जि.प.,पं.स. निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय दोन्ही राष्ट्रवादीने घेतलेला आहे. यामध्ये अन्य घटक पक्षांनाही सोबत घेण्याचे सुतोवाच करण्यातआले आहे.
सध्या तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून जि. प., पं. स. समितीचे उमेदवार निश्चित करुन एबी फॉर्म देण्यास प्रारंभ केला आहे. येत्या काही दिवसात काही नवी समिकरणे होऊ शकतात. परंतु आता याक्षणाला नवी आघाडी असा काही विचार निश्चित झालेला नाही.
जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप