

नेरळ : आनंद सकपाळ
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद निवडणूकी मध्ये शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीने निवडणूकीत मोठे यश प्राप्त होऊन साधारण एक महिना उलटला असुन, थेट निवडून आलेले नगराध्यक्ष यांनी देखील माथेरान गिरिस्थान नगर परिषदेचा कार्यभार हाती घेतला आहे.
मात्र आजमितीला उपनगराध्यक्ष पदासह दोन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाली नसल्याने, व युतीधर्म म्हणून उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक जागांपैकी एक नगरसेवक पद हे भाजपाला आपेक्षित असल्याने, उपनगराध्यक्ष पदाची माळ ही भाजपाच्या जुन्या निष्ठावंत व निवडून आलेल्या नगरसेवकाच्या गळ्यात की नव्याने पक्षात पवेश केलेल्या व निवडून आलेल्या नगरसेवकाच्या गळयात पाडणार तसेच दोन्ही स्वीकृत नगरसेवक पदांच्या जागी शिवसेना शिंदे व भाजपा असे एक एक पदावर जुन्या निष्ठावंत व नव्याने प्रवेश झालेल्या की अतापर्यंत पक्ष प्रवेश नसलेलेल्या मात्र त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याची वर्णी लागणार अशी चर्चामात्र सध्या माथेरानमध्ये सुरू असुन, गुलदस्त्यातील निवडीकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
माथेरान गिरिस्थान नगर परिषदेची निवडणूकीचा निकाल लागून साधारण एक महिना उलटला आहे. तर शिवसेना शिंदे गट व भाजपा प्रणित युतीचे थेट नगराध्यक्ष म्हणून शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत चौधरी हे निवडून आले आहे. तर माहायुतीचे एकूण 15 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापैकी शिवसेना शिंदे गटाचे 12 तर भाजपाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत.
दोन्ही स्वीकृत नगरसेवक पदांच्या जागी शिवसेना शिंदे व भाजपा असे एक एक पदावर युतीधर्म असल्याने, व या संदर्भात माथेरान शहराचे भाजपाचे माजी अध्यक्ष विलास पाटील यांचे 11 जानेवारी रोजीचे भाजपाचे नेते तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना दीलेले पत्र पहाता स्वीकृत नगरसेवक पदी जुन्या निष्ठावंत असलेल्या माजी शहर अध्यक्ष विलास पाटील की नव्याने प्रवेश झालेले व सध्या भाजपाचे माथेरान शहर अध्यक्ष प्राविण सकपाळ की इतर कोणाची वर्णी लागणार तसेच शिवसेना शिंदे गटाकडून मनोज खेडकर यांची की जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते की उबाठा गटातील असलेले मात्र शिंदे गटात पक्ष प्रवेश न झालेले मात्र शिवसेना शिंदे गटा सोबत असलेल्या कार्यकर्त्याची वर्णी लागणार अशी चर्चा मात्र सध्या माथेरानमध्ये सुरू असुन, या गुलदस्त्यात असलेला उपनगराध्यक्ष पदाची निवड व स्वीकृत नगरसेवक नियुक्ती कडे माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचा कार्यभार हा थेट नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी हाती घेऊन साधारण एक महिना होऊन देखील उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रिया ही मात्र गुलदस्त्यात असल्याने, मात्र उपनगराध्यक्ष पदासह दोन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाली नसल्याने, युतीधर्म म्हणून उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक जागांपैकी एक नगरसेवक पद हे भाजपाला आपेक्षित असल्याने, उपनगराध्यक्ष पदाची माळ ही भाजपाचे जुने निष्ठावंत व निवडून आलेले नगरसेवक संतोष शेलार की नव्याने पक्षात पवेश केलेल्या व पूर्वीच्या माजी नगरसेविका व आता पुन्हा भाजपामधून निवडून आलेल्या नगरसेविका प्रतिभा घावरे यांच्या गळयात पाडणार अशा चर्चारंगूलागल्याआहेत.