Kalamboli Gas Crematorium: कळंबोलीत गॅस शवदाहिनी बंद; 100 रुपयांऐवजी 2500 रुपयांत लाकडावर अंत्यसंस्कार

सिडको-मनपा हस्तांतरण वादामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड; लाखो खर्चून उभारलेली सुविधा निष्क्रिय
Kalamboli Gas Crematorium: कळंबोलीत गॅस शवदाहिनी बंद; 100 रुपयांऐवजी 2500 रुपयांत लाकडावर अंत्यसंस्कार
Kalamboli Gas Crematorium: कळंबोलीत गॅस शवदाहिनी बंद; 100 रुपयांऐवजी 2500 रुपयांत लाकडावर अंत्यसंस्कारPudhari
Published on
Updated on

कळंबोली : दीपक घोसाळकर

लाखो रुपये खर्चून बांधलेल्या गॅस शव दाहिनीचे केवळ हस्तांतरण न झाल्याने 100 रुपयात शव जाळण्याच्या ऐवजी 2500 रुपयांचा भुर्दंड सरणावर जातानाही द्यावा लागत आहे. मृत्यूनंतरच्या ही इहीलोकाच्या प्रवासाच्या वेळीही भावनांचा बाजार हा कळंबोलीतल्या स्मशानभूमीत केला जातो. सिडको आणि महापालिकेच्या या अद्भुत तांत्रिक भांडणाचा फटका मरणसंन्न अवस्थेत पडलेल्या जीवनाच्या अखेरच्या प्रवास करणाऱ्यांना मृत्यू पक्षातही सहन लागत आहे. याची खंत ना सिडको आणि महापालिका प्रशासनाला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Kalamboli Gas Crematorium: कळंबोलीत गॅस शवदाहिनी बंद; 100 रुपयांऐवजी 2500 रुपयांत लाकडावर अंत्यसंस्कार
Animal Husbandry Interest Subsidy Scheme: पशुपालकांसाठी मोठी खुशखबर! किसान क्रेडिट कार्ड कर्जावर 4% व्याज सवलत जाहीर

कळंबोलीतील स्मशानभूमीत सिडको प्रशासनाने लाखो रुपये खर्चून गॅसवर चालणारी शवा दाहिनीची निर्मिती केली. याचा निव्वळ उद्देश एक की नागरिकांना कमी पैशांमध्ये शवाचे दहन करता यावे. अन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांची वृक्षांची तोड कमी प्रमाणात व्हावी. प्रदूषणाचा फटकाही आजूबाजूच्या नागरिकांना बसू नये.परंतु लाखो रुपये खर्चूनही गॅस शव दाहिनी बंद अवस्थेत आढळून येते.कोणत्याही कुटुंबामध्ये कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यानंतर अखेरच्या प्रवासाची व्यवस्था

Kalamboli Gas Crematorium: कळंबोलीत गॅस शवदाहिनी बंद; 100 रुपयांऐवजी 2500 रुपयांत लाकडावर अंत्यसंस्कार
Ladki Bahin Yojana eKYC: रायगडमधील 63,780 ‘लाडक्या बहिणींना’ दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत

करण्यासाठी जेव्हा नातेवाईक कळंबोलीतल्या स्मशानभूमीत येतात,तेव्हा गॅस शव दाहीनी बाबत विचारले असता गॅस शव दाहिनी बंद अवस्थेत आहे असे चोखपणे सांगितले जाते.समोर पडलेल्या लाकडाच्या ढिकाऱ्याकडे पाहून अखेरीस ज्यांना पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे त्यांना त्यांच्या भावनांना मुरड घालून अखेरीस लाकडावर दहन करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.लाखो रुपये खर्च करून सुद्धा लाकडांची व्यवस्था का ठेवली जाते असा प्रश्नही संताजनक अवस्थेत नागरिकाकडून केला जातो.

सिडको ने निर्माण केलेली गॅस दाहिनी प्रथम चांगल्या गुणवत्तेची तयार करायला हवी. परंतु या सर्व भांडणात सिडको व महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन नागरिकांच्या सेवेस फक्त आणि फक्त गॅस शव दाहिनी ठेवायला हवी,की जेणेकरून शासनाचा महापालिकेचा सिडकोचा पर्यावरण रक्षणाचा जो निकष आहे जे मूलभूत तत्व आहे त्याचा निश्चित उपयोग होणार आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून सुद्धा महापालिकेचे कर्मचारी येणाऱ्या नागरिकांना जर गॅस शव दाहिनी बंद अवस्थेत आहे असे जर सांगितले तर त्यांना पर्यायाने त्वरित भावनेला मुरड घालून अखेरीस लाकडावरच शव दहन करावे लागत आहे.

Kalamboli Gas Crematorium: कळंबोलीत गॅस शवदाहिनी बंद; 100 रुपयांऐवजी 2500 रुपयांत लाकडावर अंत्यसंस्कार
Raigad Gram Panchayat: रायगडमध्ये 240 ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक; निवडणुका पावसाळ्यानंतर

याबाबत सिडको व महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढून कळंबोलीच्या स्मशान भूमीत फक्त आणि फक्त हायटेक पद्धतीची गॅस दाहिनी कार्यान्वित ठेवावी अशी मागणी ही आता जनतेतून होत आहे.

Kalamboli Gas Crematorium: कळंबोलीत गॅस शवदाहिनी बंद; 100 रुपयांऐवजी 2500 रुपयांत लाकडावर अंत्यसंस्कार
Konkan Forest Rights: वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर जनसुनावणी; कोकणातील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर

निकृष्ट दर्जाची गॅस वाहिनी

स्मशानभूमीचे व्यवस्थापन पाहणारे राकेश भुजबळ यांनी सिडको ने निर्माण केलेल्या गॅसवरच्या दाहिनी ह्या निकृष्ट दर्जाच्या बनवलेल्या आहेत.त्यासाठी वापरण्यात आलेले पाईप हे निकृष्ट आहेत. एक वेळ जर गॅस दाहीने वापरली तर त्याच्यामध्ये विविध तांत्रिक बाबी निर्माण होतात.आम्हाला एक शव जाळण्यासाठी पंधराशे रुपयांचा खर्च येतो.त्यासाठी आम्हाला 2100 रुपये मिळतात. त्यामध्ये सर्व व्यवस्थापन पहावे लागते.असे सांगीतले.

Kalamboli Gas Crematorium: कळंबोलीत गॅस शवदाहिनी बंद; 100 रुपयांऐवजी 2500 रुपयांत लाकडावर अंत्यसंस्कार
Roha Gold Rumour Case: रोह्यात सोन्याचे चार हंडे सापडल्याची बातमी ठरली अफवा

स्मशानभूमी व शव दाहिनी मनपाकडेे हस्तांतरित करावयाची आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती होऊ शकत नाही. परंतु एक एप्रिल ला सदरचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.

अनिकेत खांडेकर सिडको अधिकारी

सदरची गॅस शव दाहिनीचे महापालिका निश्चितच हस्तांतरित करून घेणार आहे. सिडको प्रशासन तेथील शौचालय मुतारी बाथरूम व अन्य असलेल्या इमारतींचे सुद्धा पैसे या गॅस शवदाहीनी सोबत मागत आहेत.त्यामुळे ते पैसे द्यायचे की नाही याचा विचार महापालिका करीत आहे. दाहिनी ची व्यवस्था महापालिका निश्चित करेल.

डॉ. वैभव विधाते, उपायुक्त, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news