Animal Husbandry Interest Subsidy Scheme: पशुपालकांसाठी मोठी खुशखबर! किसान क्रेडिट कार्ड कर्जावर 4% व्याज सवलत जाहीर

राज्य सरकारचा पशुसंवर्धन क्षेत्राला बूस्टर; 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
Animal Husbandry Interest Subsidy Scheme
Animal Husbandry Interest Subsidy SchemePudhari
Published on
Updated on

सुधागड : संतोष उतेकर

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने पशुसंवर्धन क्षेत्राला मोठा बुस्टर डोस दिला आहे. पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यानंतर आता किसान क्रेडिट कार्ड () धारक पशुपालकांना त्यांनी घेतलेल्या अल्पमुदतीकर्जाच्या (खेळत्या भांडवलाच्या) व्याजदरात 4 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पशुसंवर्धन विभागाने 11 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे.

Animal Husbandry Interest Subsidy Scheme
Ladki Bahin Yojana eKYC: रायगडमधील 63,780 ‘लाडक्या बहिणींना’ दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत

निती आयोगाच्या शिफारशीनुसार आणि महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या आराखड्यानुसार, कृषी व संलग्न क्षेत्रातील उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पशुपालन व्यवसायातील अडचणी दूर करून पशुजन्य उत्पादनांची मूल्यवर्धन साखळी निर्माण करणे, हा यामागील मुख्य हेतू आहे.

Animal Husbandry Interest Subsidy Scheme
Raigad Gram Panchayat: रायगडमध्ये 240 ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक; निवडणुका पावसाळ्यानंतर

योजनेचा लाभ ठराविक मर्यादेतील पशुधनासाठी मिळेल

कुक्कुटपालन: 25 हजार मांसल किंवा 50 हजार अंडी देणारे पक्षी.

दुधाळ जनावरे: 100 किंवा त्यापेक्षा कमी जनावरांचा गोठा.

शेळी-मेंढी: 500 किंवा त्यापेक्षा कमी संख्या.

वराह: 200 किंवा त्यापेक्षा कमी.

परतफेड: घेतलेल्या कर्जाची परतफेड 1 वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे.

Animal Husbandry Interest Subsidy Scheme
Konkan Forest Rights: वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर जनसुनावणी; कोकणातील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर

पशुपालनाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याने आणि व्याजात 4% सवलत लागू झाल्याने पशुपालकांचा आर्थिक भार कमी होईल. यामुळे पशुपालकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि पर्यायाने जिल्ह्याच्या उत्पादनात मोठी भर पडेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, रायगड

Animal Husbandry Interest Subsidy Scheme
Roha Gold Rumour Case: रोह्यात सोन्याचे चार हंडे सापडल्याची बातमी ठरली अफवा

कोण ठरणार पात्र? (महत्त्वाचे निकष) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही ठराविक अटी निश्चित केल्या आहेत: अनुदान मुक्त: लाभार्थ्याने केंद्र, राज्य किंवा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही इतर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नोंदणी: सर्व पशुधनाची भारत पशुधन () पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे.

डॉ. अजय वंदना बाळू कांबळे, सहायक आयुक्त, अलिबाग-रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news