Central Railway India: मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात मोठी वाढ

डिसेंबर 2025 पर्यंत 1,227 दशलक्ष प्रवासी; उत्पन्नात 5 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ
Central Railway Revenue
Central Railway Revenuepudhari photo
Published on
Updated on

रोहे : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये (डिसेंबर 2025 पर्यंत) प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात उल्लेखनीय वाढ साध्य केली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात (डिसेंबर 2025 पर्यंत) प्रवासी भाड्यातून रु 5,881.08 कोटींची उत्पन्न मिळवले असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ही रक्कम रु 5,570.33 कोटी होती, ज्यामध्ये 5% पेक्षा जास्त वाढ दर्शवते.

Central Railway Revenue
QR code school India: बागेतील झाडांना क्यूआरकोड देणारी तालुक्यातील पहिली शाळा

या आर्थिक वर्षात (डिसेंबर 2025 पर्यंत) उपनगरीय सेवांमधून रु 757.12 कोटींचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीत हे उत्पन्न रु 721.70 कोटी होते. यामध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, उपनगरी सेवांव्यतिरिक्त प्रवासी वाहतूकीतून रु.5,123.96 कोटींचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीत हे उत्पन्न रु.4,848.63 कोटी होते, यामध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

Central Railway Revenue
Mental Health Crisis Maharashtra: वाढत्या मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

प्रवासी संख्येच्या दृष्टीने, या आर्थिक वर्षात (डिसेंबर 2025 पर्यंत) मध्य रेल्वेने 1,227 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली असून, गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीत ही संख्या 1,202 दशलक्ष होती. यामध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. यामध्ये या आर्थिक वर्षात 1,073 दशलक्ष उपनगरीय प्रवाशांची वाहतूक झाली होती, गेल्या वर्षी ही संख्या 1,058 दशलक्ष होती, तर उपनगरी सेवांव्यतिरिक्त (डेमू/मेमू/मेल/ एक्सप्रेस) प्रवासी या वर्षी 154 दशलक्ष असून गेल्या वर्षी ती संख्या 144 दशलक्ष होती.

Central Railway Revenue
Palspe Sewage Water Issue: पळस्पे गावात सांडपाणी थेट नदीपात्रात; नागरिकांच्या आरोग्याला धोका

विशेष म्हणजे, डिसेंबर 2025 या एकाच महिन्यात मध्य रेल्वेने 142 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. यामध्ये 124 दशलक्ष उपनगरीय व 18 दशलक्ष उपनगरी सेवांव्यतिरिक्त (डेमू/मेमू/मेल/ एक्सप्रेस) प्रवासी समाविष्ट आहेत, तर गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीत ही संख्या 138 दशलक्ष होती. यामध्ये 122 दशलक्ष उपनगरीय व 16 दशलक्ष उपनगरी सेवांव्यतिरिक्त (डेमू/मेमू/मेल/ एक्सप्रेस) प्रवासी होते, ज्यामध्ये 3 टक्क्यांची वाढ दर्शवली जाते.

Central Railway Revenue
Raigad Police Dog Max: रायगड पोलीस दलाच्या ‘मॅक्स’ला अखेरचा सॅल्यूट; कर्तव्यनिष्ठ श्वानाचा अंत

डिसेंबर 2025 मध्ये मिळालेले एकूण उत्पन्न रु 723.27 कोटी इतके असून यामध्ये उपनगरीय सेवांमधून रु.87.58 कोटी व उपनगरी सेवांव्यतिरिक्त (डेमू/मेमू/मेल/ एक्सप्रेस) मधून रु 635.69 कोटींचा समावेश आहे, गेल्या वर्षीच्या त्याच महिन्यात हे उत्पन्न रु604.40 कोटी होते. यामध्ये सुमारे 20 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news