

रायगड : रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला ‘मॅक्स’ या नावाचा श्वानाचे 13 जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या मॅक्सला रायग पोलीस विभागातर्फे सलामी देण्यात आली.
मॅक्स श्वानचे वय आठ वर्षे दहा महिने होते. मॅक्स श्वानाने रायगड जिल्हा पोलीस दलात 17 मार्च 2018 12 जानेवारी 2026 रोजीपर्यंत कार्यकाल सेवा पार पाडली होती.
मॅक्स याची जात लॅब्रोडर अशी होती. मॅक्स श्वान याने राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्र टेकनपूर, ग्वालियर (मध्यप्रदेश) येथे पूर्ण केले होते. मॅक्स श्वानाचे कामाचे स्वरूप हे स्फोटक पदार्थ शोधक असे होते. मॅक्स श्वान यास एकूण 78 बक्षीस प्राप्त केले असून एकूण 436 व्हीव्हीआयपी कॉल व 400 व्हीआयपी बंदोबस्तची कामगिरी केली. मॅक्स श्वानाची विशेष कामगिरीत पेण बस स्थानकातील थ्रेड कॉल, माणगाव येथील गावठी बॉम्ब शोधण्याची कामगिरी, श्रीवर्धन येथील स्मोकर सेल,
रेवदंडा येथील बोयावरील जीपीएस शोधण्यास मदत, रोहा येथील गावठी बॉम्ब, रोहा येथील गावठी बॉम्ब, खालापूर येथील गावठी बॉम्ब, अलिबाग बीच वरील स्मोकर सेल अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. सन 2023 मध्ये कोकण कर्तव्य मेळावा स्पर्धेमध्ये प्रथम कमांक प्राप्त केला होता. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अशा व्हीव्हीआयपी दौऱ्यांमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. रायगड पोलिस दलात सध्या मर्फी, ऑस्कर, रॉकी, रुफस हे डॉग स्कॉड कामगिरी बजावत आहे.