

तळा : दक्षिण कोकणात अनेक शाळांचा पट हा कमी होत असताना तळा तालुक्यातील जि. प. शाळा कळमशेत शाळेचा पट हा 2023 ला 5 होता तो आता वाढून 16 झाला आहे. पुढे शाळेचा पट वाढविण्यासाठी येथील शिक्षकांनी निर्धार केला असल्याचे पहावयास मिळाले आहे.ही शाळा चौथीपर्यंत असूनउपक्रम राबविणारी शाळा म्हणून पुढे येत आहे. गुणवत्तापूर्ण शाळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शाळेच्या बागेत असणाऱ्या झाडांना क्यूआरकोड दिले असून त्या झाडाची पुर्ण माहिती स्कॅन केल्यानंतर समोर येते.
या शाळेला 2019 मधे आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे.तसेच माझी मुख्यमंत्री शाळा पुरस्कार 2023-2024 द्वितीय क्र. व 2024-2025 प्रथम क्र. व 2025-2026 परसबाग तृतीय क्रमांक प्राप्त असे पुरस्कार प्राप्त शाळा गुणवत्तेतही तेवढीच पुढे येताना दिसत आहे. स्पर्धा परीक्षा मंथनमधे सर्व विद्यार्थी यशस्वी होत आहेत. तालुकागुणवत्तायादीतही आली आहेत.
2025-2026 मधे स्पर्धा परीक्षा मंथन, प्रज्ञाशोध व आरटीएस परीक्षेस बसविली असून विद्यार्थांचा दररोज सराव घेतला जाऊन सुट्टीच्या दिवशी ही सराव घेतला जात आहे. सध्या राजू माणिक पठारे मुख्याध्यापक व मागीलवर्षी शिक्षण सेविका सीमा नामदेव चौधरी या रूजू झाल्या आहेत. 2023 मधे शाळेचा पट 5 वर आला होता आता हा पट वाढत जात असून 16 पट असून पुढीलवर्षी हा पट वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक हे स्वखर्चाने बाहेर गावाहून येणाऱ्या 9 विद्यार्थ्यांना स्वतःच्या गाडीतून आणतात. येथे वायफाय सेवा, लॅपटॉप, प्रिंटर, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर अशा सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होते. सर्व ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ, बौध्दवाडी कळमशेत, ते शाळा व्यवस्थापन समिती, अधिकारी वर्ग यांचे चांगले मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते.