Maharashtra Politics : २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासोबत ४ लोकच राहतील : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

Maharashtra Politics : २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासोबत ४ लोकच राहतील : चंद्रशेखर बावनकुळे

पनवेल; विक्रम बाबर : “२०२४ च्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटातील ४ लोक त्यांच्यासोबत राहतील, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी थोडीशी शिल्लक राहील,” असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

महाविजय २०२४ च्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात ‘महाविजय २०२४’ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ३३ मावळ लोकसभा मतदार संघात आज दौरा होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बोचरी टीका त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४५ पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विजयासाठी भाजपचे ६०० सुपर वॉरियर काम करतील हे सांगताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर निशाणा साधला. ठाकरे गटातील ४ लोक त्यांच्यासोबत राहतील, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button