महाड : परस्परांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले खा. सुनील तटकरे आणि महाडचे आम. भरत गोगावले यांचे राजकीय मनोमिलन झाले असून, आगामी काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती होण्याचे संकेत उभय नेत्यांनी दिलेले आहेत.
आगामी काळात रायगडात या दोघांच्या नियोजनातून निवडणूक रणनिती तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दीड
वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर स्थापित झालेल्या भाजप शिवसेनेच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभाग झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील या संदर्भात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाडचे आ. भरत गोगावले यांनी खा. सुनील तटकरे व ना. आदिती तटकरे यांची घेत- लेली भेट जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय चित्र बदलण्याचे संकेत देणारी ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पुढील महिन्याच्या ५ तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. मागील वर्षभरात देखील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये भाजप सेनेमधील असलेली दरी अथवा समन्वय अभाव प्रामुख्याने महाड- पोलादपूरमध्ये समोर आला होता. या बार्बी विचारात घेता या दोन पक्षांच्या युतीमध्ये तिसऱ्या पक्षाचा झालेला समावेश व महाविकास आघाडीची सत्ता जाण्यास कारणीभूत असलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतची अजूनही राहिलेली घोषणा या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी महाडचे आ. भरत गोगावले व खा. सुनील तटकरे यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
महाड-पोलादपूरसह जिल्ह्यातील सुमारे २०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. महाविकास आघाडीने काही दिवसापूर्वीच या सर्व ठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावण्याची घोषणा केली आहे. या बाबींचा विचार करता महाड-पोलादपूर मधील प्रत्येकी २१ ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये महायुतीमार्फत करावयाची सामायिक रणनीतीबाबत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आ. गोगावले यांनी कालच व्यक्त केली होती. या सर्व बाबींचा विचार करता आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तशाच येऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायतींच्या निवडणुकांबाबतही महायुती मधील तिन्ही पक्षांच्या जागांचे समान वाटप कशा पद्धतीने होणार हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या दोन नेत्यांच्या राजकीय भेटीचे आता वेगवेगळे अर्थ राजकीय तज्ज्ञांकडून लावले जाऊ लागले आहेत. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात जर भरत गोगावले हे मंत्री झाले तर रायगडचे | पालकमंत्रीपद त्यांना मिळू शकते. समजा त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झालाच नाही तर मात्र | पालकमंत्रीपदाची माळ कदाचित अदिती तटकरे यांच्यापण गळ्यात पडू शकते. असे तर्कवितर्क | वर्तविले जात आहेत. त्यामुळे आता सर्वांच्याच नजरा संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेल्या |आहेत. गोगावले यांनीही आपण अजुनही मंत्री होण्याबाबत आशावादी आहोत, जर समावेश झालाच तर स्वाभाविकच पालकमंत्रीही मीच असेन असे वारंवार अधोरेखित केलेले आहे