भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पनवेल दौऱ्यावेळी शेकाप, महाविकास आघडीचे आंदोलन..! | पुढारी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पनवेल दौऱ्यावेळी शेकाप, महाविकास आघडीचे आंदोलन..!

पनवेल; विक्रम बाबर महाविजय २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार आहे.  या निमित्ताने ते आज पनवेलला येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. याचवेळी शेकाप, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्यावर उतरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले.

बावनकुळे पनवेलला येणार म्हणून पनवेल शहरातील रस्त्याची डागडुजी करून शहर खड्डेमुक्त केले आहे. पनवेल मधील पालिकेचे प्रशासन रात्रभर रस्त्यावर उतरून काम करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेत्‍यांनी केला आहे. या विरोधात पनवेल मधील शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पनवेल प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. प्रशासकीय राजवट की भाजपची पगारी राजवट ? असा आरोप शेकाप नेते गणेश कडू यांनी केला आहे. या वेळी या नेत्यांनी हातात कालचे रस्ते आणि आजचे रस्ते यांचे फोटो दाखवून निषेध व्यवत केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ३३ मावळ लोकसभा मतदार संघात त्यांचा आज दौरा आहे.

हेही वाचा : 

Back to top button