पनवेल; विक्रम बाबर : पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवारी झालेल्या गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणूकीला रात्री गालबोट लागले. करंजाडे येथील माथेफिरू गणेशभक्ताने पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या करंजाडे पोलीस चौकीची तोडफोड करुन चार ते पाच पोलिसांचा चावा घेतल्याची घटना घडल्याचे उघड झाले आहे. या गणेशभक्ताच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
नवी मुंबई शहरात २८ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढून गणेशाचे विसर्जन करण्यात आले. नवी मुंबईत रात्री उशिरा पर्यंत गणेश विसर्जन सुरू होते. यादरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विसर्जन मिरवणक उत्साहाला गालबोट लागले. करंजाडे येथे राहणाऱ्या एका गणेशभक्ताने करंजाडे पोलीस चौकीची तोडफोड करत पोलीस चौकीत उपस्थित असलेल्या चार ते पाच पोलिसांचा चावा घेत त्यांचे लचले तोडले. हा गणेशभक्त एवढ्यावरच थांबला नाही तर, पोलीस चौकीत पोलीस वापरत असलेले कॉम्प्युटर, लॅपटॉप तसेच टीव्हीची तोडफोड करून नुकसान केले. तसेच चौकीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेनंतर संबंधीत गणेशभक्ताला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक केल्यानंतर हा गणेशभक्त मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा :