रायगड : पतीच्या तोंडावर मिरचीपूड टाकून महिलेच्या दागिन्यांवर डल्ला

रायगड : पतीच्या तोंडावर मिरचीपूड टाकून महिलेच्या दागिन्यांवर डल्ला

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : तळोजा येथे मोटारसायकलवरुन आलेल्या लुटारुंनी गणेश दर्शन घेऊन रिक्षामधून घरी परतत असलेल्या महिलेचे दागिने लुटल्याची घटना घडली. या घटनेतील लुटारूंनी महिलेच्या रिक्षाचालक पतीच्या तोंडावर मिरचीपूड टाकून पलायन केले.

तळोजा पोलिसांनी या लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील तक्रारदार सुनीता काशीनाथ पाटील (४०) या तळोजा पाचनंद येथे राहण्यास असून त्यांचे पती तळोजा परिसरात रिक्षा चालवतात. सायंकाळच्या सुमारास पाटील दाम्पत्य आपल्या रिक्षातून पनवेलमधील चिंध्रण गावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे गणेश दर्शनासाठी गेले होते. गणेश दर्शन झाल्यानंतर पाटील दाम्पत्य आपल्या रिक्षाने तळोजा येथे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांची रिक्षा भोईर वाडा येथे आली असताना त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या लुटारूंनी रिक्षा चालवत असलेल्या काशीनाथ पाटील यांना कुतरपाडा येथे जाण्याचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. यावेळी काशीनाथ पाटील यांनी त्यांना पाठीमागे जाण्यास सांगितले असता, मोटारसायकलवरील दुसऱ्या लुटारूने संधी साधून रिक्षामध्ये पाठीमागे बसलेल्या सुनीता पाटील यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे ५१ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व ४५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची बोरमाळ खेचून उलट्या दिशेने पलायन केले. पळून जाताना या लुटारूंनी रिक्षा चालक काशीनाथ पाटील यांच्यावर मिरचीपूड फेकली. या प्रकारानंतर पाटील दाम्पत्याने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news