रायगड : जादूटोणा प्रकरणातील मुख्य मांत्रिकाला बुलढाण्यातून अटक | पुढारी

रायगड : जादूटोणा प्रकरणातील मुख्य मांत्रिकाला बुलढाण्यातून अटक

रोहा; महादेव सरसंबे : रोहा तालुक्यातील धामणसई येथील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बुलढाणा येथून अटक केली. गेली दीड महिन्यांपासून तो फरारी होता. अमोल सोळंके (रा. निवाना, ता. संग्रामपूर) असे मुख्य मांत्रिकाचे नाव आहे.

रोहा तालुक्यातील धामणसई येथील एका खासगी शाळेत १२ ऑगस्टरोजी जादुटोणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ग्रामस्थांनी पर्दाफाश करुन हा प्रयत्न उधळला होता. पैशांचा पाऊस पाडतो, असे या मांत्रिकाने सांगितले होते. यावेळी ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर यातील मुख्य मांत्रिक फरार झाला होता. या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली होती.

पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांचा तपास सुरु होता. रोहा पोलिस उपनिरीक्षक हिवरकर व त्यांच्या टिमने मंगळवारी (दि.२६) यातील मुख्य मांत्रिक असलेल्या अमोल सोळंके याला बुलढाणा येथून अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button