

पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतकरी वर्गातील कामगत हा पारंपारिक खेळ व शेतीची पद्धत २१ व्या शतकात लोप पावत चालली आहे. या खेळाला संजीवनी देण्याचे काम श्री क्षेत्र स्वयंभू महादेवाचा मुरा येथील शेतकरी लक्ष्मण झुंजार यांनी केले. त्यांनी ही परंपरा कायम सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.
महादेवाचा मुरा या ठिकाणी पूर्वीपासून चालत आलेला कामगत हा पारंपारिक खेळ सध्या लोप पावत चालला आहे. ही परंपरा पुनर्जिवीत करण्याचे काम आज (दि. ३) लक्ष्मण झुंजार यांनी केले. नव्या पिढीला कामगत कशी असते, हे माहित नाही. याची माहिती त्यांना व्हावी व शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून आज (दि.३ सप्टेंबर) सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत झुंजार यांनी स्वतःच्या शेतामध्ये कामगत खेळ आयोजित केला. जुन्या चालीरितीला आपलंस करीत गावातील शेतकरी वर्गाने या खेळाचा आनंद लुटला. तालुक्यातील कापडे गावापासून ते मोरसडे विभाग, देवळे विभाग, साखर चांदके आदी खोऱ्यातील सर्व शेतकरी बांधव एकत्र आले व त्यांनी वाजत-गाजत हा खेळ खेळला. तसेच या पारंपरिक परंपरेला महत्व देत जुन्या आठवणींना उजाळा दिला
पूर्वी शेती करण्यासाठी आधुनिक अवजारे नव्हती, त्यामुळे गावातील शेतकरी एकत्र येऊन शेतीची मशागत करत होते. या परंपरेलाच कामगत असे म्हणतात. तीच परंपरा आज जोपासली गेली. गावागावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येत हा खेळ खेळला जातो. पूर्वीच्या काळात हाताने शेतीची कामे केली जात असे. शेतातील गवत, तृण हातानी खरडून काढायचे मात्र ही परंपरा लोप पावली आहे. ती पुन्हा जागृत करण्यासाठी कामगत परंपरा रविवारी सुरू करण्यात आली.
हेही वाचा :