रायगडावरील चित्त दरवाजा जवळ दरड कोसळली!, गाड्यांचे नुकसान

रायगडावरील चित्त दरवाजा जवळ दरड कोसळली!, गाड्यांचे नुकसान

नाते (रायगड); पुढारी वृत्तसेवा : किल्ले रायगडच्या चित्तदरवाजाच्या पायथ्या जवळील पन्नास मीटर भागांमध्ये आज (दि. १३) दुपारी तीनच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे या ठिकाणी उभ्या असलेल्या काही गाड्यांचे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास चित्त दरवाजाच्या पायथ्याजवळील मार्गावर सुमारे ५० मीटर अंतरावर महाडच्या दिशेने दरड कोसळली. या ठिकाणी उभ्या असलेल्या काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर समोरच असलेल्या काही दुकानांना देखील याचा फटका बसला आहे. तसेच तेथील एका दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनामार्फत तातडीने पंचनामा व आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश निर्गमित केल्याची माहिती महाड प्रांत कार्यालयातून देण्यात आली आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news