पिंपरी : जप्त वाहनांची परस्पर विक्री, गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : जप्त वाहनांची परस्पर विक्री, गुन्हा दाखल

पिंपरी : बँकेने वसुली एजंट म्हणून ज्याला काम दिले त्याच्याकडील कामगाराने सीझ केलेल्या सहा वाहनांची परस्पर विक्री करून 11 लाख 25 हजार रुपयांचा अपहार केला. ही घटना सन 2018 ते 16 ऑगस्ट 2022 या कालावाधीत आकुर्डी, वेळे, (ता. वाई) येथे घडली. फिर्यादी संतोष लक्ष्मण काशीद (वय 47) (रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) हे बँकेचे वसुली एजंट म्हणून काम करतात. फिर्यादीने आरोपी महेंद्र हनुमंत पवार (वय 41 रा. वेळे जि.सातारा) यास आपल्याकडे कामाला ठेवले होते.

फिर्यादी यांच्या सांगण्यावरून आरोपीने कर्ज परत फेड न करणार्‍या 11 लाख 25 हजार रुपये किंमतीची सहा वाहने सीझ केली. मात्र, फिर्यादी किंवा बँकेची परवानगी न घेता आरोपीनी ही वाहने परस्पर आपल्या गावी वेळे येथील गोडाऊनमध्ये जमा केली. या वाहनांची परस्पर विक्री देखील केली. या विषयी त्याने फिर्यादी अथवा बँकेला न कळवता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या विषयी आरोपीला जाब विचारला असता वाहन परत देणार नाही, असे म्हणत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.याविरोधात फिर्यादीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर कलम 420, 408, 504, 506अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button