

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
कोकण हा नारळ सुपारीच्या बागांमुळे जगात प्रसिद्ध आहे.मुरुड तालुक्यातील नारळाला मुंबईत चांगला मान व भाव मिळत होता.बागायतदार आनंदी होते.परंतु 2021 ला वादळ मुरुड अलिबाग किनाऱ्यावर धडकले आणि कोकणातील बागायतदारांच्या बागेतून लाखो नारळ व सुपारी झाडे कोसळली आणि बागायतदारांचे भविष्य अंधारमय झाले.शासनाने रायगडचा सर्वे केला आणि खूप उशिराने मदत जाहीरकेली ती पण 1 नारळ झाडाला 600 रुपये खरतर ते मोडलेले झाड मुळापासून काढण्यासाठी मालकाला 2200 रुपये खर्च आला.
नवीन नारळ लावल्यानंतर 10 वर्ष उत्पनासाठी वाट पाहायची आहे.त्यामुळे नाराज झालेल्या नारळ बागायतदाराने निराश होऊन वाडी करण्याचे सोडून दिले.नारळाची झाडे कमी झाल्याने नारळ पाडेकरी काम सोडून गेले.पाडेकरी मिळत नसल्याने नारळ उत्पादनात मोठी घाट झाली. त्यात वर्षभर माकडांची टोळी येते आणि छोटे नारळ खाऊन उरलेले खाली पडते नारळ झाडावर मोठे होऊनच देत नाही.सुपारीचे पेंड कंची असतंच पडतात आणि नाश करतात.माकडांवर शाहसनचे कोणतेही नियंत्रण नसल्याने मुरूडचे बागायतदार नैराशेच्या छायेत आहेत.
रायगडात नारळापासून माडी बनवण्याचा व्यवसाय जोरात होता.परंतु वादळानंतर माडी होणारे नारळ झाडे मोठ्याप्रमाणात पडल्याने माडी व्यवसाय धोक्यात आला.त्यात माडी अधिकृत विक्रीच्या परवाने मिळण्यास शासनाची कठोर नियम माडी उपदकांना त्रासदायक ठरूलागले.खरतर मुरुडची माडी हि जग प्रसिद्ध मुंबईत रोज एसटीच्या टपावर 20 ड्रम माडी विक्रीसाठी जात असते. परंतु शासनाची परवाने बाबत धोरणे कटोरा व जाचक असल्याने मुंबईत जाणारी माडी बंद झाली.माडी काढणारे मिळत नसल्याने माडी व्यायसायीकडबघाईला आलाआहे.
नारळ म्हटल्यावर तर आपल्याला तर नारळाचे पाणी पेऊ वाटत. आणि नारळच्या पाण्याचे फायदे सांगण्याची गरज नाय कारण प्रत्येकाला माहिती आहे कि नारळाचे पाणी हे आपल्या शरीराला किती चांगले असते.
नारळ, ज्याला इंग्रजीमध्ये कोकोआनट म्हणतात, केवळ भारतातच नाही तर जगभरात आढळते. आजपासून नव्हे तर या फळाचे महत्त्व जुन्या काळापासून चालत आले आहे. विशेषत: हिंदू धर्मात त्याचे महत्त्व अफाट आहे.नारळाच्या झाडाच्या फळाचे अनेक वापर आहेत.
नारळ किंवा खोबरं खाद्य मांस पांढरे आणि मांसल आहे. हे स्वतःच पाककृतींमध्ये खावे किंवा वापरले जाऊ शकते आणि नारळ तेल तयार करण्यासाठी वापरला जाणारा घटक देखील असतो.
खोबऱ्याच्या भुसऱ्याचे आणखी एक नारळ झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची मजबूत, तंतुमय पोत आहे. भुसा दोरी, फिशिंग नेट, ब्रशेस आणि गाभाळ घालण्यासाठी वापरला करण्यात येतो, आणि तो इंधन स्त्रोत म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. उर्वरित झाडाचा वापर देखील केला जाऊ शकतो.
हे सर्व फायदे नारळाच्या झाडापासून मिळवता येतात परंतु ग्रामीण भागात अद्यावत मशीन व यंत्राची कमी व शासनाच्या नियोजन व माहिती लोकांपर्यंत पोहच नसल्याने व विविध व्यवसाय करण्यासाठी सहज मिळणारे कर्ज बागायतदारांना मिळत नसल्याने निराश झालेला बागायतदार शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे.
माझ्या 4 पिढ्या नारळ सुपारीच्या बागांवर उपजीविका करत होत्या, परंतु 2021 ला झालेल्या वादळात आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो.माज्या वाडीतील वादळात 12 नारळ व 250 सुपारी झाडे मोडली शासनाने दिली मदत अति अल्प असल्याने नारळ झाडे पुन्हा लावण्याची हिंमत झाली नाही.मोडलेल्या झाडांना कापून त्याजागेत व्यावसायिक इमारत बनवत आहे.आपली उपजीविकेचे साधन म्हणून पाहत आहे.पूर्वीसारखे नारळ सुपारीची बाग फुलवण्यासाठी शासनाने नियोजन बद्ध लागवडीच्या योजना ग्रामीण भागात राबवणे गरजेचे आहे.माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी बागायतदारांची आहे.
उदय दांडेकर, बागायतदार