Mumbai Entry Gate Project: मुंबईच्या चारही वेशींवर भव्य प्रवेशद्वार व क्लॉक टॉवर उभारणार; महापौर रितू तावडे यांचा संकल्प

पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गांवर सुशोभीकरणाचा प्रस्ताव; अर्थसंकल्पात तरतुदीची आयुक्तांकडे मागणी
Mumbai Entry Gate Project
Mumbai Entry Gate ProjectPudhari
Published on
Updated on

मुलुंड : मुंबईच्या चारही वेशींवर भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याचा संकल्प नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी केला आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी सूचना त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

Mumbai Entry Gate Project
APMC Navi Mumbai Vegetable Price: एपीएमसीत भाजीपाला पडून; दरांत 20-30% घसरण

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत प्रवेश करताना पर्यटकांना शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी मुंबईतील चारही प्रवेशद्वारांवर भव्य प्रवेशद्वार व क्लॉक टॉवर उभारण्याचे नियोजन आहे.

Mumbai Entry Gate Project
Navi Mumbai Air Quality Index: नवी मुंबईत विषारी हवेची काळी छाया; एअर क्वालिटी इंडेक्स 273 पार

पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड चेक नाका, मुलुंड ऐरोली मार्ग, वाशी-मानखुर्द मार्ग असे तीन प्रवेशमार्ग आहेत, तर पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर चेकनाका हा एक प्रवेशमार्ग आहे. या चारही मार्गांवर सौंदर्यीकरण, सुशोभीकरण व क्लॉक टॉवर उभारण्यात आले तर जागतिक स्तरावर मुंबईची ओळख निर्माण होईल, असे महापौरांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Mumbai Entry Gate Project
Kandivali Drug Bust: कांदिवलीत अनधिकृत पानटपरीवर ड्रग्ज सापडले; आमदार योगेश सागर यांचे स्टिंग ऑपरेशन

क्लॉक टॉवर म्हणजे काय?

क्लॉक टॉवर अर्थात वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाचा मनोरा. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील संकुलातील राजाबाई क्लॉक टॉवर हा सुमारे 85 मीटर उंच मनोरा प्रसिद्ध आहे. व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील हा मनोरा पर्यटकांसाठी खास आकर्षण असते. असेच घड्याळ मनोरे मुंबईच्या प्रवेशद्वारांवर उभारण्याचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news