

मुंबई : भारतीय जाहिरात क्षेत्र आगामी काळात मोठी झेप घेणार असून, 2026 मध्ये या क्षेत्राची वाढ 9.7 टक्क्यांनी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘डब्ल्यूपीपी मीडिया’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘धिस इयर नेक्स्ट इयर’ या अहवालानुसार, जाहिरातींतून मिळणारा एकूण महसूल 2,01,891 कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. 2025 च्या तुलनेत यामध्ये 17,844 कोटी रुपयांची निव्वळ वाढ होणार आहे.
अहवालानुसार, एकूण जाहिरात खर्चात डिजिटल माध्यमांचा वाटा तब्बल 68.1 टक्के इतका असेल. विशेषतः ‘ई-कॉमर्स’ क्षेत्र (व्यापारी जाहिराती) 24.2 टक्के दराने सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून समोर आले आहे. डब्ल्यूपीपी मीडियाचे दक्षिण आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आज भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यापार आणि ग््रााहकांची गोपनियता यांचा एकत्रित संगम होत आहे. केवळ जाहिरात दाखवणे पुरेसे नसून, ग््रााहकाचा शोध घेण्यापासून ते खरेदी करेपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यावर बँड्सचा भर असेल.’ द. आशियाचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी अश्विन पद्मनाभन यांनी नमूद केले की, आगामी काळात ‘क्विक कॉमर्स’ हे केवळ विक्रीचे साधन न राहता जाहिरातींचे मुख्य माध्यम बनेल.
डिजिटल चॅनेल : 11.1 टक्के वाढीचा अंदाज
आऊटडोअर आणि सिनेमागृह : 8.9 टक्के वाढ
वृत्तपत्रे (प्रिंट) : 4.4 टक्के वाढीसह आपले स्थान टिकवून आहेत.
दूरदर्शन (ढत) : 3.1 टक्के वाढ. विशेषतः ‘कनेक्टेड टीव्ही’मुळे या क्षेत्राला आधार मिळाला आहे.
रेडिओ आणि संगीत : 1.5 टक्के वाढ