APMC Navi Mumbai Vegetable Price: एपीएमसीत भाजीपाला पडून; दरांत 20-30% घसरण

मुंबईतील फेरीवाल्यांवरील कारवाईचा परिणाम; वाढीव आवक, उठाव नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान
APMC Navi Mumbai Vegetable Price
APMC Navi Mumbai Vegetable PricePudhari
Published on
Updated on

नवी मुंबई : एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये सध्या भाज्यांची चांगली आवक होत आहे. त्यात शुक्रवारी मुंबईतील किरकोळ व्यापारी बाजारात माल घेण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे भाजीपाला पडून राहिला. त्यामुळे दरांत आणखी 20 ते 30 टक्के घसरण झाली आहे. सध्या भाज्यांसाठी पोषक हवामान असल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.

APMC Navi Mumbai Vegetable Price
India Advertising Industry Growth: भारतीय जाहिरात क्षेत्रात 2026 मध्ये 9.7 टक्के वाढीचा अंदाज

मुंबई महापालिकेकडून गेले काही दिवस मुंबईतील फेरीवाल्यांवर दररोज कारवाई सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हे फेरीवाले भाजीपाला खरेदीसाठी एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारीही आवक मोठ्या प्रमाणात झाली. मात्र मालाला उठाव नसल्याने भाजीपाला पडून राहिला. त्यामुळे व्यापाऱ्यांना भाव पाडून तो विकावा लागला. तरीही माल शिल्लक राहिल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम थेट भाज्यांच्या दरांवर झाला आहे.दरात सरासरी 20 ते 30 टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी, दोडका, गवार यांसारख्या भाज्यांचे दर कमी झाले आहेत.

APMC Navi Mumbai Vegetable Price
Navi Mumbai Air Quality Index: नवी मुंबईत विषारी हवेची काळी छाया; एअर क्वालिटी इंडेक्स 273 पार

पालेभाज्या घाऊक दर (जुडी रुपयांमध्ये)

कोथिंबीरची जुडी : 10 ते 12

पालक : 6 ते 7

शेपू : 8 ते 10

भाज्यांचे घाऊक दर (किलो रुपयांमध्ये)

वाटाणा : 22 ते 28

गवार : 50 ते 80

ढोबळी मिरची : 36 ते 50

शेवगा शेंग : 50 ते 70

भेंडी : 26 ते 30

टोमॅटो : 10 ते 14

घेवडा : 16 ते 20

कारली : 30 ते 36

काळी वांगी : 16 ते 22

APMC Navi Mumbai Vegetable Price
Kandivali Drug Bust: कांदिवलीत अनधिकृत पानटपरीवर ड्रग्ज सापडले; आमदार योगेश सागर यांचे स्टिंग ऑपरेशन

पदपथावरील कारवाईमुळे किरकोळ विक्रेते बाजारात येत नाहीत. त्यातच आवक जास्त असल्याने माल विक्री न झाल्याने पडून राहात आहे. परिणामी दर कोसळले आहेत. एकीकडे ग्राहकांना कमी दरांचा फायदा होत असला तरी दुसरीकडे शेतकरी आणि घाऊक व्यापाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच राहिल्यास बाजारातील ही मंदी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शंकर पिंगळे, घाउक व्यापारी, भाजी मार्केट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news