नाशिक : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याचे संपर्कप्रमुखांचे आवाहन | पुढारी

नाशिक : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याचे संपर्कप्रमुखांचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत येत्या 26 ते 29 मे कालावधीत होणारे शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचे आवाहन चौधरी यांनी केले. नाशिक जिल्हा शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मध्यवर्ती कार्यालयात पार पडली.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान मोहीम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात खासदार अरविंद सावंत तसेच म्हाडा अध्यक्ष विनोद घोसाळकर हे शिवसंपर्क अभियानाचे नेतृत्व करणार आहेत. शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आतापासून तयारीला लागावे व शिवसेनेचे विचार तसेच ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय घराघरांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पदाधिकार्‍यांना केले. याप्रसंगी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार सुहास कांदे, सुनील पाटील, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे, महिला आघाडी संपर्क संघटक रंजना नेवाळकर, रवींद्र सुर्वे, निवृती जाधव, जगन आगळे, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, महेश बडवे, बाळासाहेब कोकणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button