

धायरी, पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रोड परिसरातील माणिकबाग भागास विविध नागरी समस्यांचा विळखा पडला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचर्याचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यावर खोदाई काम करून केबल उघड्याच ठेवण्यात आल्या आहेत. भंगार वाहने येथील अंतर्गत रस्त्यावर उभी केलेली आहेत. पावसाळ्यात पाण्याचा मोठा लोंढा येऊन येथील सोसायट्यांमध्ये पाण्याचे तळे होते. येथील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशा समस्यांमुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
या संपूर्ण परिसरालाच विविध समस्यांनी घेरले आहे. हा परिसर मोठ्या लोकसंख्येचा आहे. छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहतीही येथे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वाहनांची वर्दळ येथे असते. या सर्व समस्यांमुळे येथील कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत. या सर्व नागरी समस्येतून येथील नागरिकांची त्वरित सुटका करण्यात यावी; अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना देण्यात आले आहे.
कचर्याबाबत संबंधित अधिकार्यांना बोलावून सूचना देण्यात आली आहे. तसेच येथील गतिरोधक हटविण्याबाबत रस्ते विभागाला कळविण्यात आले आहे.
– प्रदीप आव्हाड (सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय)
हेही वाचा