अहमदनगर : नगरपरिषद प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम | पुढारी

अहमदनगर : नगरपरिषद प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम

नगर : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व नेवासा नगरपंचायतीच्या आरक्षण कार्यक्रमापाठोपाठ आता प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 5 जुलैपर्यंत मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिध्द होणार आहेत.
श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या नगरपरिषदांची तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी राज्य निवडणूक आयोगाने जोरात सुरु केली.

ऐकावं ते नवलच! चक्क उंदरांनी १० तोळे सोने पळवले, पोलिसांनी गटारातून केले जप्त

अंतिम प्रभागरचना प्रसिध्द होत नाही तोच, आरक्षण कार्यक्रम जाहीर केला. आरक्षण कार्यक्रम पूर्ण होत नाही तोच आयोगाने मतदान याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 21 जून 2022 रोजी नगरपरिषदांची प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. या याद्यांवर 27 जूनपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत.

हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर 1 जुलै 2022 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रामाणित करुन प्रसिध्द केली जाणार असल्याचे नगरपरिषद विभागाचे सह आयुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायाल्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नऊ नगरपरिषदांबरोबरच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरु आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची देखील धावपळ सुरु आहे.

सातारा : युवक काँग्रेसचा केंद्र सरकार विरोधात निषेध मोर्चा

या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांची तयारी देखील सुरु झाली आहे. इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. मतदार यादी कार्यक्रमाबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा सपाटा आता सुरु झाला आहे.

Back to top button