मोकळ्या जागा बनतात रात्रीच्या वेळी ‘ओपन बार’; व्हाइट कॉलर गुंडांचा धुमाकूळ | पुढारी

मोकळ्या जागा बनतात रात्रीच्या वेळी ‘ओपन बार’; व्हाइट कॉलर गुंडांचा धुमाकूळ

वडगाव शेरी, पुढारी वृत्तसेवा: कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, सोपाननगर, खराडी-चंदननगर, आयटी पार्कचे मैदान आणि आपले घर सोसायटीच्या मोकळ्या जागांमध्ये रात्री सातनंतर चारचाकी आणि दुचाकी गाड्यांवर बसून व्हॉइट कॉलर गुंड (आयटी कर्मचारी) मद्यपी ओपन बार सुरू करतात.

यामुळे रात्री सातनंतर महिलांना या रस्त्यावरून जाणे अवघड झाले आहे.सोपाननगर, गुलमोहर सेंटर, विमानगर, वेकफिल्ड आयटी पार्क, विमानतळ रस्त्यावरील मोकळ्या जागा, कल्याणीनगर बिशप शाळेच्या मागे, विमाननगर आयबीस हॉटेलच्या मागे, खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळील मोकळी जागा, झेन्सार आयटी पार्क मैदान, आपले घर सोसायटीकडे जाणारी मोकळी जागा

श्री संत गजानन महाराज पालखीचे हिंगोलीत स्‍वागत

विमाननगर ई-स्पेस आणि मंत्री कॉम्प्लेक्सजवळील सायकल ट्रक, तसेच वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागांतील फुटपाथ आणि मोकळ्या जागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने येण्यास सुरुवात होते. आयटी पार्कमधून सुटलेले कर्मचारी, विद्यार्थी, पीजीमध्ये राहणारे युवक आणि परप्रांतीय व्हॉइट कॉलर गुंड दारू पीत घोळका करून पहाटेपर्यंत या परिसरात बसलेले असतात. या मद्यपींना स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर वादावादी होते.

अनेकदा मद्यपी स्थानिक नागरिकांना मारहाण करतात. रस्त्यावर दारूच्या बॉटल्या फोडतात, जोरजोरात ओरडतात. एकमेकांमध्ये मारहाण करतात. रस्त्यावरून जाणार्‍या महिलांना छेडखानी करतात. मद्यपी रोडरोमिओंमुळे सायंकाळी महिला व मुली मोकळ्या जागेजवळच्या रस्त्यावरून जात नाहीत. रात्री महिलांसाठी रस्ता बंद हा अलिखित नियम झाला आहे. मद्यपींच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मद्यपींचा बंदोबस्त करावा. मद्यपींना आवरण्यासाठी या भागामध्ये गस्त सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा

हडपसर उड्डाणपुलाखालील दुभाजक धोकादायक

वारकर्‍यांच्या स्वागताला पुणे सज्ज

अहमदनगर : नगरपरिषद प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम

Back to top button