तिने छंदातून जगण्याचा मार्ग केला यशस्वी | पुढारी

तिने छंदातून जगण्याचा मार्ग केला यशस्वी

हडपसर, पुढारी वृत्तसेवा: प्रत्येकांच्या जीवनात कमी-जास्त प्रमाणात दु:ख असते. त्याचे भांडवल करण्यापेक्षा सतत आपल्या आवडत्या छंदातून जीवनाचा मार्ग यशस्वी करता येतो, असा विश्वास सोनाली कडू या आपल्या मर्दानी खेळातून स्वतःबरोबर इतर मुला- मुलींनाही देत आहे. या उपक्रमास हडपसर पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे मर्दानी खेळ प्रशिक्षक सोनाली कडू यांनी सांगितले. मर्दानी खेळ हा एक प्राचीन युद्ध प्रकार आहे.

आजकाल हे प्रामुख्याने स्वसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व एक शारीरिक व्यायाम आणि खेळ म्हणून खेळले जाते. हे स्व:संरक्षणाचे एक उत्तम स्वरूप आहे. मनाची एकाग्रता, धैर्य, आत्मविश्वास, संयम इत्यादी व व्यायामाच्या दृष्टीने याचे ज्ञान घेणे फार महत्त्वाचे आहे.
मर्दानी कलेचा प्रसार करण्यासाठी आमची संस्था ’शिवाजी राजे मर्दानी आखाडा (शिवाजीनगर गावठाण) विविध शस्त्रांचे प्रशिक्षण देते. यामध्ये लाठी (काठी), तलवार (तलवार), दांडपट्टा, भाला, फरी, गदगा यासारखी शस्त्रे चालविण्यास शिकवते.

मोकळ्या जागा बनतात रात्रीच्या वेळी ‘ओपन बार’; व्हाइट कॉलर गुंडांचा धुमाकूळ

गौरवशाली इतिहासाची परंपरा लाभलेल्या या कलेचा वारसा जपण्यासाठी व या कलेचा प्रसार करण्यासाठी म्हणून सध्या हडपसर परिसरामध्ये शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये शिबिरार्थींना प्राथमिक स्वरूपाचे लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रशिक्षक म्हणून सोनाली जीवनदास कडू, सौरभ जीवनदास कडू हे बहीण-भाऊ प्रशिक्षण देत आहेत, तर यांना संस्थेचे प्रमुख विजय आयवळे हे मार्गदर्शन करीत आहेत.

अधिकारी होण्याचे स्वप्न : कडू

माझे रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात बारावीपर्यंत व एस.एम.जोशी महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण काम करून पूर्ण केले. पुढे एमपीएससीची तयारी सुरू आहे. माझे वडील वाहनचालक आहेत, आणि आई घरकाम करते. सोनाली एमपीएससी करत असून, या मर्दानी खेळाचे प्रशिक्षण तिने घेतले आहे व परिसरातील मुला-मुलींना शिकवण्याचे काम करीत आहे. मला यामधून जिद्द, विश्वास निर्माण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून मी माझी वाटचाल करीत आहे.असे सोनाली कडू हिने सांगितले.

हेही वाचा

अहमदनगर : नगरपरिषद प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम

Nashik Crime : धारदार शस्त्रासह तडीपार गुंड ताब्यात

वारकर्‍यांच्या स्वागताला पुणे सज्ज

Back to top button