पुणे : तरुणाचा खून करून फरार झालेल्या चौघांना अर्ध्या तासात ठोकल्या बेड्या

खून
खून
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुर्ववैमनस्यातून तरुणाचा खून करून फरार झालेल्या चौघांना विश्रांतवाडी पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या अर्ध्या तासात गजाआड केले. पुर्वी दुचाकीला कट मारल्याच्या कारणातून झालेल्या भांडणात तरुणाचा चाकू भोकसून खून केल्याची घटना बुधवारी (दि.६ जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडारवस्ती विश्रांतवाडी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली होती.

बाळू अर्जुन शिंदे (वय 48, रा. विश्रांतवाडी), फ्रान्सेस ऊर्फ भैय्या ऍन्थोनी स्वामी (वय 20), सर्फराज सलीम शेख ऊर्फ गोल्या (वय 20, रा.धानोरी), अकबर शहाबुद्दीन शेख (वय 22, रा. भीमनगर विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर तुषार जयवंत भोसले (वय 24, रा. दत्तवाडी, दांडेकर पुल) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य भोसले (वय 22) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार भोसले व भैय्या स्वामी यांच्यात पुर्वी दुचाकीला कट मारल्याच्या रागातुन वाद झाले होते. याच कारणावरुन बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भोसले व स्वामी यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी त्यांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर तुषार भोसले याने त्याच्या जनता वसाहत व विश्रांतवाडी येथील मित्रांना बोलावून विश्रांतवाडी येथील वडारवस्तीमध्ये भैय्या स्वामीचा शोध घेऊ लागला.

त्यावेळी ते तुषार भोसले व त्याचे मित्र बाळू शिंदे याच्या घरात घुसले. त्यांनी शिंदे याला जबर मारहाण केली. त्याचा राग आल्याने शिंदे व त्याच्या घराजवळ जमलेले सर्फराज, अकबर हे हत्यारे घेऊन भोसले व त्याच्या मित्रांच्या पाठीमागे धावले. त्यावेळी शिंदे व त्याचे साथीदार आणि भोसले व त्याच्या साथीदारांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर शिंदे व त्याच्या साथीदारांनी भोसले यास पकडून त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात भोसले गंभीर जखमी झाला.

त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. त्यावेळी पोलीस हवालदार दिपक चव्हाण, शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे यांना आरोपी भिमनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, विजयकुमार शिंदे उपनिरीक्षक लहू सातपुते कर्मचारी यशवंत किर्वे, संदीप देवकाते, शेखर खराडे, संजय बादरे यांची दोन पथके तयार करून आरोपींना वडारवाडी व भीमनगर परिसरातून पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खूनाची कबुली दिली. पोलिस उपायुक्त रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news