पिंपरी: कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या अभंगाचा प्रत्यय देहूत आला

पिंपरी: कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या अभंगाचा प्रत्यय देहूत आला

शशांक तांबे

पिंपरी: कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी… या अभंगाचा प्रत्यय देहू येथे सोमवारी (दि. 20) आला. देहूमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकर्‍यांची उपस्थिती होती. देहू ग्रामस्थांनी केलेल्या अन्नछत्रातील जेवणाचा आस्वाद वारकर्‍यांनी घेतला. पिझ्झा विक्रीसाठी आलेल्या पिझ्झ्याला मात्र वारकर्‍यांनी पसंती दिली नाही. देहूमध्ये पिझ्झा कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर पिझ्झा विक्रीचा प्रयोग करण्याचे ठरवले होते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून या ठिकाणी पिझ्झाची गाडी उभी करण्यात आली होती.

परंतु वारकर्‍यांनी पिझ्झाला पसंती न देता, पिझ्झा नको भाजी भाकरीच चांगली, असे म्हणत पिझ्झाला नाकारले. देहूमध्ये भक्त निवासाजवळ पिझ्झाची गाडी उभी केली होती. पाच – सहा दिवसांपासून उभ्या असणार्‍या गाडीमध्ये खवय्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. देहू ग्रामस्थांकडून वारकर्‍यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. विविध ठिकाणी अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले होते.

वारकर्‍यांनी अन्न छत्राच्या जेवणाला पसंती दिली. देहू ग्रामस्थांनी वारकर्‍यांच्या चहा नाष्ट्यापासून ते जेवणाची सोय केली आहे.
वारकर्‍यांमध्ये शेतकर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. भाजी-भाकरी हेच शेतकर्‍यांचे अन्न असल्याने पिझ्झासारखे पदार्थ शेतकर्‍यांना रुचत नाहीत. त्यामुळे पिझ्झा विक्रेत्यांकडे न जाता वारकर्‍यांनी भाजी भाकरीलाच पसंती दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news